सीएएस (कन्सॉलिडेटेड अकाउंट स्टेटमेंट) म्हणजे काय?

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

ज्याप्रमाणे एखाद्या मुलाच्या शाळेच्या प्रगतीपुस्तकामध्ये निरनिराळ्या शिक्षकांनी शिकवलेल्या सर्व विषयांच्या परीक्षांचे वर्षभराचे गुण दाखवले जातात, त्याचप्रमाणे कन्सॉलिडेटेड अकाउंट स्टेटमेंट (सीएएस) एक असे स्टेटमेंट आहे जे एका महिन्यामध्ये गुंतवणूकदाराने निरनिराळ्या म्युच्युअल फंड्समध्ये केलेले वित्तीय व्यवहार दाखवते. जर आपण तीन वेगवेगळ्या फंड मध्ये गुंतवणूक केली असेल, तर सर्व वित्तीय व्यवहार जसे खरेदी, विक्री, अदलाबदल, एसआयपी/ एसटीपी/ एसडब्ल्यूपी, मिळालेले/ पुन्हा गुंतवणूक केलेले लाभांश(डिव्हिडंड) इत्यादी यात दर्शवले जातात.

सीएएसमध्ये आपल्या पॅनशी जोडणी केलेल्या सर्व पोर्टफोलिओ मधील सुरुवातीचा आणि शेवटचा बॅलन्स देखील दर्शवला जातो. बँकेचे तपशील, पत्ता बदलणे, नामनिर्देशित व्यक्ती बदलणे इत्यादी बदल हे अवित्तीय व्यवहार आहेत त्यामुळे ते सीएएस मध्ये दर्शवले जात नाही. सीएएस मध्ये निरनिराळ्या फंड हाऊसेस मधील वित्तीय व्यवहारच दर्शवले जातात असे नाही, तर यात डीमॅट मोड मध्ये इतर सिक्युरिटीज मध्ये केलेले व्यवहार देखील असतात. याचा अर्थ सीएएस मध्ये आपले स्टॉक-संबंधी व्यवहार देखील असतात.

म्हणूनच, सीएएस हे खरोखर आपल्या सर्व गुंतवणुकींसंबंधी वित्तीय व्यवहार दाखविणारे एकत्रित स्टेटमेंट आहे. सीएएस दर महिन्याला तयार केले जाते आणि पुढील महिन्याच्या 10 तारखेपर्यंत गुंतवणूकदारांकडे पाठवले जाते. सीएएस विशिष्ट पॅन धारकांसाठी तयार केले जाते आणि म्हणूनच त्या पॅनशी संबंधित सर्व वित्तीय व्यवहार यात दर्शवले जातात. जर एखाद्या पॅन धारकाने एखाद्या महिन्यामध्ये कुठलेच वित्तीय व्यवहार केले नसतील, तर सीएएस तयार केले जात नाही.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे