लार्ज कॅप आणि ब्ल्यू-चिप फंड्समध्ये काय फरक आहे?

लार्ज कॅप आणि ब्ल्यू-चिप फंड्समध्ये काय फरक आहे?

म्युच्युअल फंड सही आहे?

आपण म्युच्युअल फंडबद्दल माहिती काढताना, त्यांची कामगिरी, एनएव्ही आणि रँक पहाताना RST ब्ल्यूचिप फंड किंवा XYZ लार्ज कॅप फंड अशी नावे ऐकली असतील. फंडच्या नावात ‘ब्ल्यूचिप फंड’ आणि ‘लार्ज कॅप फंड’ हे शब्द समान अर्थाने वापरले जातात कारण हे दोन्ही असे इक्विटी म्युच्युअल फंड दर्शवतात जे स्टॉक एक्सचेंजवरील लार्ज कॅप कंपनींच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करतात.

जर आपण ऑक्टोबर 2017 मध्ये जारी केलेले आणि जून 2018 पासून लागू झालेले सेबीचे प्रॉडक्ट कॅटेगरायझेशन सर्क्युलर पाहिलेत, तर त्यात इक्विटी फंडच्या प्रकारांमध्ये ब्ल्यू चिप फंड हे नाव कुठेच दिसत नाही. याचा अर्थ असा होतो का, की आता आपल्यासाठी ब्ल्यू चिप फंड उपलब्ध नाहीत? नाही, याचा अर्थ फक्त एवढाच आहे की नाव काहीही असू देत, जर एखादा फंड मार्केट कॅपिटलायझेशन प्रमाणे टॉप 100 कंपनींच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करत असेल, तर तो आता लार्ज-कॅप म्युच्युअल फंड या प्रकारात मोडतो.

भारतात निरनिराळ्या स्टॉक एक्सचेंजवर सार्वजनिक लिस्टिंग केलेल्या अनेक कंपन्या आहेत. लार्ज-कॅप म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशन प्रमाणे भारतातील सार्वजिनक लिस्टिंग केलेल्या कंपनींपैकी टॉप 100 कंपन्या (मार्केट कॅपिटलायझेशन = सार्वजनिकरीत्या उपलब्ध शेअर्सची संख्या * एका शेअरची किंमत).

ब्ल्यूचिप स्टॉक्स म्हणजे एखाद्या अर्थतंत्रातील अशा सर्वात मोठ्या कंपनींचे स्टॉक्स ज्यांचे सार्वजनिक लिस्टिंग झालेले आहे. लार्ज-कॅप फंड आपल्या मालमत्तेचा 80% भाग अशा ब्ल्यूचिप स्टॉक्समध्ये गुंतवतात. त्यामुळे काही एएमसी त्यांच्या लार्ज-कॅप फंड्सना ब्ल्यूचिप म्युच्युअल फंड असे नाव देतात.

यापुढे जेव्हा आपल्याला स्थिर परताव्याची शक्यता असलेल्या डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल, तेव्हा नावावर जाऊ नका. ते कुठल्या प्रकारात मोडतात हे पहा आणि जर ते लार्ज कॅप फंड्स असतील, तेव्हा फंड ठरवण्या अगोदर तुमची पुढील स्टेप म्हणजे विश्लेषण आणि योग्य निवड करा.

453
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे