डायरेक्ट प्लॅन / रेग्युलर प्लॅन म्हणजे काय?

डायरेक्ट प्लॅन / रेग्युलर प्लॅन म्हणजे काय?

म्युच्युअल फंड सही आहे?

सर्व म्युच्युअल फंड स्किम्स दोन योजना उपलब्ध करून देतात- डायरेक्ट आणि रेग्युलर. डायरेक्ट प्लॅनमध्ये, गुंतवणूकदाराला एखाद्या एएमसी मध्ये थेट गुंतवणूक करावी लागते, ज्यामध्ये वितरकाला कोणत्याही व्यवहाराची सुविधा पुरवत नाही. रेग्युलर प्लॅनमध्ये, गुंतवणूकदाराला एखाद्या मध्यस्थामार्फत गुंतवणूक करावी लागते, जसे की वितरक, ब्रोकर किंवा बँकर, ज्याला एएमसी कडून योजनेवर लागू होणारे वितरण शुल्क दिले जाते.

म्हणून डायरेक्ट प्लॅनचे खर्च गुणोत्तर कमी असते कारण तेथे कोणतेही वितरण शुल्क समाविष्ट नसते, तसेच वितरकाला व्यवहार करण्यासाठी दिलेल्या कमिशनमुळे रेग्युलर प्लॅनचे खर्च गुणोत्तर थोडे जास्त असते.

एका MF स्किमचे व्यवस्थापन करण्यासाठी त्याची किंमत आणि खर्च आवश्यक आहे, जसे की व्यवस्थापन खर्च, विक्री आणि वितरकाचा खर्च, देखरेख आणि रजिस्ट्रारचे शुल्क इ. असे सर्व खर्च फंडच्या खर्च गुणोत्तरामध्ये समाविष्ट असतात. असे खर्च सेबी-नियामकाने विहित केलेल्या मर्यादेत असतात.

अशा प्रकारे जर गुंतवणूकदाराने डायरेक्ट प्लॅनमधून थेट गुंतवणूक करण्याचे निवडले, तर त्यांना खर्च वाचवण्याच्या कारणासाठी थोड्याफार फरकाने जास्त परतावे मिळतील, पण त्यांना मध्यस्थांकडून वितरण आणि त्या संबंधित सेवा पुरवल्या जाणार नाहीत.

मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे