एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) म्हणजे काय?

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

ईटीएफ हा एक एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे, स्टॉक एक्सचेंजमध्ये एखादा साधा स्टॉक घेण्यासारखा हा म्युच्युअल फंडातील व्यवहार नसतो.

सामान्यतः ईटीएफ मधील युनिट्स मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंजच्या अधिकृत ब्रोकरकडून खरेदी केले आणि विकले जातात. ईटीएफ मधील युनिट्स हे स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट असतात आणि एनएव्ही ही बाजारातील चढ-उतारानुसार बदलते. ईटीएफचे युनिट्स हे स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट असल्यामुळे ते साध्या ओपन एंड इक्विटी फंड्स सारखे खरेदी केले किंवा विकले जात नाहीत. एक्सचेंजच्या कोणत्याही मर्यादांशिवाय गुंतवणूकदारत्याला हवे तेवढे युनिटस खरेदी करु शकतो.

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, ईटीएफ हे असे फंड्स आहेत जे इंडेक्सचा मागोवा घेत असतात जसे की सीएनएक्स निफ्टी किंवा बीएसई सेन्सेक्स वैगेरे. जेव्हा तुम्ही ईटीएफचे शेअर्स/युनिट्स खरेदी करता तेव्हा तुम्ही पोर्टफोलिओचे शेअर्स/युनिट्स विकत घेत असता जे त्याच्या मुख्य इंडेक्सचे उत्पन्न आणि त्यावरील परतावा ह्याचा मागोवा घेत असतात. ईटीएफ आणि इतर इंडेक्स फंड्स मधील मुख्य फरक म्हणजे ईटीएफ हे त्याच्या संबंधित इंडेक्सच्या बाहेर जाऊन कार्य करत नाहीत पण इंडेक्सच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतात. ते बाजाराला मागे टाकण्याचा प्रयत्न करत नाहीत तर तेच बाजार होण्याचा प्रयत्न करतात.

ईटीएफमध्ये दररोज उच्चतम लिक्विडिटी असते आणि म्युच्युअल फंड स्किम्स पेक्षा फी सुद्धा कमी असते ज्यामुळे ते वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी आकर्षक पर्याय ठरतात.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे