डेब्ट फंड्सच्या कामगिरीवर कशाचा परिणाम होतो?

डेब्ट फंड्सच्या कामगिरीवर कशाचा परिणाम होतो? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

डेब्ट फंड्स आपला पैसा बाँड आणि मनी मार्केट इंस्ट्रूमेंटमध्ये गुंतवतात ज्यां वर व्याज मिळते आणि ते नियमित व्याज देण्यासाठी वचनबद्ध असतात. हे व्याज फंडला मिळते आणि त्यामुळे आपल्याला फंडच्या गुंतवणूकदारांना परतावा मिळतो. बाजारातील व्याजाचा दर जेव्हा बदलतो तेव्हा फिक्स्ड इनकम सिक्युरिटीजच्या किंमती म्हणजे बाँड आणि मनी मार्केट इंस्ट्रूमेंटच्या किंमती, बदलतात पण विरुद्ध दिशेने. व्याजाचा दर वाढल्यावर या अ‍ॅसेटची किंमत कमी होते आणि तसेच याच्या उलट सुद्धा होते. त्यामुळे, डेब्ट फंड्सची एनएव्ही या सिक्युरिटीजच्या किंमती बदलल्यामुळे बदलत असते. या फंडच्या एकूण परताव्यावर या एनएव्हीतील बदलाचा प्रभाव पडतो.

व्याज दरातील बदला शिवाय, बाँड्सच्या क्रेडिट रेटिंगमध्ये बदल झाल्याने सुद्धा डेब्ट फंड्सच्या परताव्यावर प्रभाव पडू शकतो. क्रेडिट रेटिंग ही बाँड जारी करणाऱ्या संस्थेची बाजारातील पत दर्शवते. रेटिंग कमी झाल्याने या बाँड्सची किंमती कमी होण्याची शक्यता असते. अशाने, ते बाँड्स ज्या फंड्सने विकत घेतलेले असतील, त्यांच्या एनएव्हीवर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे, एखाद्या डेब्ट फंडमधील बाँड्सची क्रेडिट रेटिंग खालावल्यामुळे आपला एकूण परतावा कमी होण्याची शक्यता असते.

परतफेड न करू शकण्याची जोखीम वाढल्यामुळे, किंवा बाँड जारी करणारी संस्था व्याज भरू न शकल्यामुळे किंवा मुद्दल परत करू न शकल्यामुळे डेब्ट फंडचा परतावा प्रभावित होतो कारण या व्याजामुळेच त्या फंडपासून आपला एकूण परतावा वाढत असतो.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे