महागाई म्हणजे काय?

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

सोप्या शब्दात मांडायचे, तर महागाई म्हणजे काळाच्या ओघामध्ये उपलब्ध पैशांच्या तुलनेत किंमतीत होणारी वाढ. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, आपण एका ठराविक रकमेला दोन वर्षांपूर्वी जी खरेदी करत होतो त्या प्रमाणात आज आपण कितीतरी कमी खरेदी करतो.

हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण बघूया. समजा आपण आज एक ग्रिल्ड सँडविच 100 रुपयांना खरेदी करतोय. वार्षिक महागाई 10% आहे. पुढच्या वर्षी त्याचतेच सँडविचसाठी आपल्याला 110 रुपये मोजावे लागतील. महागाईच्या दरा इतके जरी आपले उत्पन्न वाढले नाही, तर आपण तेच सँडविच किंवा असे कोणतेही उत्पादन खरेदी करू शकणार नाही, बरोबर ना?

त्याबरोबरच महागाई गुंतवणूकदारांना त्यांच्या सध्याच्या रहाणीमानाचा दर्जा तसाच राहावा म्हणून त्यांच्या गुंतवणुकीमधून त्यांना किती परतावा (%) मिळणे आवश्यक आहे, हे देखील सांगते. उदाहरणार्थ जर गुंतवणूक X मधून 4% परतावा मिळाला आणि महागाईचा दर 5% असेल तर गुंतवणुकीवरचा खरा परतावा -1%(5%-4%) असेल.

म्युच्युअल फंड्स आपल्याला गुंतवणुकीचे असे सक्षम पर्याय देतात, जे आपल्याला महागाईला मागे टाकणारे परतावे देतात. आपण योग्य प्रकारच्या म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक करून आपली खरेदी करण्याची क्षमता दीर्घकाळ सुरक्षित ठेवू शकता.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे