नेट अ‍ॅसेट व्हॅल्यू (NAV) (निव्वळ मालमत्ता मूल्य) म्हणजे काय?

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

म्युच्युअल फंड्स मधील एखाद्या स्किमची कामगिरी ही नेट अ‍ॅसेट व्हॅल्यू (NAV) ने दर्शवली जाते. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, स्किमने धारण केलेल्या सिक्युरिटीजचे बाजारमूल्य म्हणजे NAV. म्युच्युअल फंड हे गुंतवणूकदारांनी गुंतवलेले पैसे सिक्युरिटीजच्या बाजारपेठेमध्ये गुंतवतात. सिक्युरीटीजचे बाजारमूल्य हे दर दिवशी बदलत असते, त्यामुळे स्किमची NAV देखील दिवसागणिक बदलत असते. प्रति युनिटची NAV म्हणजे एखाद्या दिवशी असलेले स्किमच्या सिक्युरिटीजचे बाजार मूल्य भागिले एकूण युनिट्सची संख्या.

शेजारील व्हिडिओमध्ये NAV मूल्य कसे काढले जाते स्पष्ट करुन सांगण्यात आले आहे.

सगळ्या म्युच्युअल फ़ंडातील स्किमचे NAV सेबी म्युच्युअल फंड नियमावलीनुसार हे बाजार बंद झाल्यानंतर व्यवहार संपले की घोषित केले जातात.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे