अल्पवयीन गुंतवणूकदार सज्ञान झाल्यावर बदल करण्याची प्रक्रिया कशी आहे?

अल्पवयीन गुंतवणूकदार सज्ञान झाल्यावर बदल करण्याची प्रक्रिया कशी आहे? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

अल्पवयीन मुले आईवडील/पालक यांच्या माध्यमातून म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकतात. अशा परिस्थितीत, अल्पवयीन गुंतवणूकदार पहिला आणि एकमेव खातेधारक असतो आणि जन्मजात पालक (वडील/ आई) किंवा कायदेशीर पालक(न्यायालयाद्वारे नियुक्त) त्याचे प्रतिनिधीत्व करतात. जन्मजात पालक ज्यांचे प्रतिनिधीत्व करत आहेत ती अल्पवयीन मुले, 18 व्या वर्षी आणि कायदेशीर पालक ज्यांचे प्रतिनिधीत्व करत आहेत ती मुले 21 व्या वर्षी सज्ञान होतात.

अल्पवयीन गुंतवणूकदार सज्ञान झाल्यावर आपल्याला एकमेव खातेधारकाची अल्पवयीन या सद्यस्थिती बदलून सज्ञान करून घेण्यासाठी अर्ज करावा लागतो, तसे केले नाही तर भविष्यातील सर्व व्यवहार (एसआयपी/ एसडब्ल्यूपी/ एसटीपी) स्थगित केले जातील. साधारणपणे म्युच्युअल फंड्स पालकांना आणि अल्पवयीन गुंतवणूकदारांना आवश्यक कागदपत्रे दाखल करण्यासाठी आगाऊ नोटीस पाठवतात. पालकांना स्थिती सज्ञान करून घेण्यासाठी, अल्पवयीन गुंतवणूकदाराची स्वाक्षरी एका बँकेच्या अधिकार्‍याकडून साक्ष्यांकित करून अर्ज करावा लागतो. अल्पवयीन गुंतवणूकदाराचा बँक खात्याचा नोंदणी अर्ज आणि केवायसी सुद्धा या अर्जाबरोबर दाखल करावे लागते.

यापुढील कर एकमेव खातेधारकाला (सज्ञान) भरावा लागेल. गुंतवणूकदार अल्पवयीन असेपर्यंत त्याच्या खात्यातील सर्व उत्पन्न आणि लाभ आईवडील/पालकांच्या उत्पन्नामध्ये जोडले जाते आणि आईवडील/पालकांना त्यावर कर द्यावा लागतो. ज्या वर्षी अल्पवयीन गुंतवणूकदार सज्ञान होतात, त्या वर्षापासून त्यांना एक वेगळी व्यक्ती म्हणून वागवले जाईल आणि ते त्या वर्षी जेवढे महिने सज्ञान असतील तेवढ्या महिन्यांसाठी त्यांना कर भरावे लागतील.

452
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे