सिस्टिमॅटिक विड्रॉअल प्लॅन(एसडब्ल्युपी) म्हणजे काय?

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

काही लोक म्युच्युअल फंड्समध्ये नियमित उत्पन्नासाठी गुंतवणूक करतात, आणि सहसा ते डिव्हीडंट मिळवण्याच्या पर्याय शोधत असतात. म्हणूनच बऱ्याच स्किम्स विशेषतः डेब्ट ओरिएंटेड स्किम्स मध्ये मासिक किंवा त्रैमासिक डिव्हीडंट पर्याय असतात. इथे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की डिव्हीडंट्स स्किमला झालेल्या नफा किंवा फायद्यामधून वितरित केले जातात आणि ते प्रत्येक महिन्याला मिळतील याची कोणतीही खात्री नसते. जरी फंड हाउस सातत्याने डिव्हीडंट्स देण्याचा प्रयत्न करत असेल, तरी (डिस्ट्रीब्युटेबल सरप्लस) बाजारपेठेच्या चढ-उतारानुसार आणि फंडच्या कामगिरीनुसार निश्चित केले जातात. 

इथे मासिक उत्पन्न मिळवण्यासाठी अजून एक पर्याय आहे: सिस्टिमॅटिक विड्रॉअल प्लॅन (SWP). इथे आपल्याला एका स्किमच्या ग्रोथ प्लॅन मध्ये गुंतवणूक करायला लागते आणि एक मासिक देय रक्कम निश्चित करून नमूद लागते. त्यानंतर, एका ठरवलेल्या तारखेला त्या निश्चित रकमे इतक्या युनिट्स ची रोख रक्कम मिळते. उदाहरणार्थ, एखादा गुंतवणूकदार 10,00,000 रुपये गुंतवून प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला 10,000 रुपये मिळण्याची विनंती करू शकतो. तेव्हा रुपये 10,000 किमतीचे युनिट्स दर महिन्याच्या 1 तारखेला रोख रकमेत बदलले जातील. 

इथे हे लक्षात घेणे गरजेचे आहे, की डिव्हीडंट्स आणि एसडब्ल्युपीज या दोन्हींसाठी लागू होणारा कर वेगवेगळा असतो, आणि गुंतवणूकदारांना त्याप्रमाणे बदल करणे गरजेचे असते. 

*मासिक उत्पन्न हे खात्रीशीर नसते आणि त्यांना भविष्यातील खात्रीशीर परतावा असे समजू नये.

मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे