जर दोन किंवा अधिक हप्ते चुकले तर म्युच्युअल फंड्सचे काय होईल?

जर दोन किंवा अधिक हप्ते चुकले तर म्युच्युअल फंड्सचे काय होईल?

म्युच्युअल फंड सही आहे?

आपण म्युच्युअल फंड्स मध्ये नियमितपणे आणि/किंवा एकरकमी गुंतवणूक करू शकता. पहिल्या परिस्थितीत आपण किती वारंवार गुंतवणूक करायची आहे ह्याची निवड करू शकता. प्रतिदिन/ प्रत्येक आठवड्याला/ मासिक, आपण आपली एसआयपी मधील गुंतवणूक स्वयंचलित करू शकता.

ही स्वयंचलितता आपण पुढील तारखेचे धनादेश देऊन किंवा बँक खात्यामधून इलेक्ट्रॉनिक डेबिट करून साध्य करु शकता. इलेक्ट्रॉनिक डेबिट्स हे “डायरेक्ट डेबिट” सुविधा किंवा एनएसीएच(राष्ट्रीय स्वयंचलित क्लिअरिंग हाऊस) मधून करता येऊ शकते. या प्रक्रियेसाठी प्रत्येक म्युच्युअल फंड्स कडे फॉर्म्स उपलब्ध असतात. 

आपल्याला प्रत्येक महिन्याला नवीन फॉर्म भरावा लागत नाही किंवा कोणत्या स्किम मध्ये गुंतवणूक करायची हे ठरवावे लागत नाही, त्यामुळे आपले कष्ट वाचतात. फक्त स्किम निवडा, रक्कम आणि तारीख भरा आणि आपला व्यवहार आपण निवडलेल्या कालावधीसाठी स्वयंचलितपणे होईल. आपण सहा महिने किंवा अधिक काळासाठी एसआयपी सुरू करू शकता. आपल्या बँक खात्यात पुरेशी रक्कम असल्याची खात्री करा.

आपला प्रश्न येथे अर्थपूर्ण बनतो. जर आपण दोन सलग हप्ते चुकवले तर फंड हाऊस आपण दिलेले पुढील तारखेचे धनादेश बँकेत भरणे बंद करू शकेल आणि न वापरलेले चेक्स परत करेल, किंवा आपल्या खात्यातून डेबिट करणे बंद करेल. येथे कोणताही दंड आकारला जात नाही किंवा जप्ती येत नाही.

आपण त्याच खात्यात कोणत्याही वेळी एसआयपी परत सुरू करू शकतो.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे