मी म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक केव्हापासून सुरू करायला पाहिजे?

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

एक फारच सुंदर चिनी म्हण आहे, "वृक्ष लावण्याची सर्वात योग्य वेळ 20 वर्षांपूर्वीची होती. दुसरी सर्वात योग्य वेळ आत्ताची आहे."

गुंतवणूक सुरू करण्याची वाट बघण्याचे काहीच कारण नाही, जर आपल्याकडे गुंतवणूक करण्यासाठी पैसे असतील तर. त्यातही, स्वतः गुंतवणूक करण्यापेक्षा त्यासाठी म्युच्युअल फंड्स वापरणे नेहमीच अधिक योग्य असते.

गुंतवणूक सुरू करण्यासाठी किमान वयाची अट नसते. जेव्हा आपण कमवायला आणि बचत करायला सुरुवात करता, तेव्हाच आपण म्युच्यु्अल फंड्समध्ये गुंतवणूक सुरू करू शकता. खरे तर, लहान मुले सुद्धा म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणुकीसाठी खाते उघडू शकतात आणि त्यात त्यांना वाढदिवस किंवा सणांच्या दिवशी मिळालेले पैसे ते ठेवू शकतात. त्याच प्रमाणे, म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी वयाची कमाल मर्यादा सुद्धा नाही.

म्युच्युअल फंड्समध्ये निरनिराळ्या उद्दिष्टांसाठी योग्य अशा निरनिराळ्या स्किम असतात. काही दीर्घकालावधी मध्ये वाढ करून घेण्यासाठी योग्य आहेत, तर काही सुरक्षा आणि नियमित मिळकतीसाठी आहेत, तर इतर अगदीच अल्पकालीन लिक्विडिटीसाठी असतात.

आपण पाहू शकता की आपले वय कितीही असो, किंवा आपली गरज कशाही प्रकारची असो, म्युच्युअल फंड्सकडे प्रत्येकासाठी उपाय असतात.

452
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे