ईटीएफमध्ये कोणी गुंतवणूक करायला हवी?

ईटीएफमध्ये कोणी गुंतवणूक करायला हवी? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

ईटीएफ हे शेअर बाजारात कमी किंमतीत पैसे गुंतवण्याचे एक साधन आहे. यात लिक्विडिटी असते आणि लगेच सेटलमेंट होते कारण यांचे लिस्टिंग एक्सचेंजवर असते आणि याची ट्रेडिंग स्टॉक प्रमाणेच होते. ईटीएफ एखाद्या स्टॉक इंडेक्सचे अनुसरण करतात आणि आपण आपल्या निवडीप्रमाणे काही स्टॉकमध्ये गुंतवणूक करता त्यापेक्षा यामध्ये अधिक डाइवर्सिफिकेशन असते.

ईटीएफ मध्ये आपल्या इच्छेनुसार शॉर्ट सेलिंग किंवा मार्जिनवर विकत घेण्याची सोय असते. ईटीएफमुळे गुंतवणुकीचे इतर पर्याय जसे कमॉडिटीज, विदेशी इंडेक्स आणि आंतरराष्ट्रीय सिक्योरिटीज इत्यादी आपल्यासाठी सुलभ होतात. आपण आपल्या पोजीशनच्या हेजिंगसाठी(वाचवण्यासाठी) ऑप्शन आणि फ्यूचर सुद्धा वापरू शकता, हे पर्याय म्युच्युअल फंड गुंतवणुकींमध्ये उपलब्ध नसतात.

तरीही, ईटीएफ प्रत्येक गुंतवणूकदारासाठी योग्य नाहीत. नवीन गुंतवणूकदारांसाठी इंडेक्स फंड अधिक योग्य पर्याय आहेत कारण यात त्यांना विशिष्ट स्टॉक न निवडता दिर्घकालीन इक्विटी गुंतणुकीचे फायदे मिळू शकतात. 

योग्य ईटीएफ निवडण्यासाठी आर्थिक बाजारांची चांगली समज असावी लागते, जी बहुतांश लहान गुंतवणूकदारांकडे नसते. त्यामुळे, आपल्या ईटीएफ गुंतवणुकींचे व्यवस्थापन करण्यासाठी काही प्रमाणात गुंतवणुकीमध्ये स्वतः सामील व्हावे लागते. 

285
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे