फिक्स्ड इन्कम म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक का करावी?

फिक्स्ड इन्कम म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक का करावी? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

फिक्स्ड इन्कम म्युच्युअल फंडामध्ये, (म्युच्युअल फंडाचा एक प्रकार) त्या फंडाच्या ॲसेटच्या वाटपानुसार आणि सेबीच्या अनुज्ञेय मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि मर्यादेनुसार कॉर्पोरेट बाँड्स, सरकारी बाँड्स, मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स आणि इतर डेट सिक्युरिटीजसारख्या फिक्स्ड इन्कम ॲसेट्समध्ये गुंतवणूक केली जाते. व्याजाच्या आणि भांडवल वाढीच्या माध्यमातून परतावा मिळवणे हे त्यांचे उद्दिष्ट असते. हा सोयीस्करपणा गुंतवणुकीच्या विविध उद्दिष्टांसाठी आणि जोखीम स्वीकारण्याच्या तयारीसाठी योग्य ठरतो. फिक्स्ड इन्कम म्युच्युअल फंडांना डेट किंवा बाँड फंड्स असेही म्हणतात.

फिक्स्ड-इन्कम म्युच्युअल फंड्स गुंतवणूकदारांसाठी अनेक वैशिष्ट्ये प्रदान करतात, जसे की:

  • विविधता: या फंड्सची सरकारी आणि कॉर्पोरेट बाँड्ससारख्या विविध फिक्स्ड-इन्कम सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करून विविधता प्रदान केली जातेज्यामुळे पोर्टफोलिओची एकंदर जोखीम कमी होते.
  • लिक्विडिटी: ओपन-एंडेड फिक्स्ड इन्कम फंडांमध्ये तरलता शक्य असते, विशेषतः तातडीच्या आर्थिक परिस्थितीत, कारण त्यांना लॉक-इन कालावधी नसतो.
  • तुलनेने कमी जोखीम: हे फंड पूर्णपणे जोखीम-मुक्त नसले तरी कमी ते मध्यम जोखमीचे मानले जातात.
  • अतिरिक्त उत्पन्न: फिक्स्ड इन्कम फंड हे उत्पन्न मिळवण्याचा अतिरिक्त स्रोत प्रदान करू शकतात, विशेषतः व्यवस्थापन शुल्काच्या अधीन राहून, पद्धतशीरपणे रक्कम काढण्याच्या योजनांद्वारे, ज्यामुळे तुमच्या प्राथमिक कमाईस पूरक उत्पन्न मिळते आणि एकंदर आर्थिक स्थैर्य सुधारते.
  • निवृत्तीचे नियोजन: बाजारातील जोखमींच्या आणि फंडाच्या कामगिरीच्या अधीन राहून पद्धतशीरपणे रक्कम काढण्याच्या योजनांच्या माध्यमातून नोकरी संपल्यानंतरच्या वर्षांमध्ये कमी जोखमीच्या, कमी परताव्याच्या उत्पन्नाच्या प्रवाहाचे नियोजन करण्यासाठी हे फंड्स निवृत्तीच्या नियोजनात एक महत्त्वाचा घटक ठरू शकतात.

फिक्स्ड इन्कम म्युच्युअल फंड्स हे जोखीम टाळू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आकर्षक असतात. उच्च जोखमीच्या गुंतवणुकींऐवजी ते सातत्यपूर्ण, माफक, परतावा मिळवू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी योग्य आहेत.

फिक्स्ड-इन्कम फंड्स परताव्याची हमी देत नाहीत. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की वास्तविक परतावा हा बाजाराची परिस्थिती आणि इतर घटकांच्या अधीन असतो.  गुंतवणूकदारांना हा फंड त्यांच्यासाठी योग्य आहे की नाही याबद्दल शंका असल्यास, त्यांनी त्यांच्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा.

अस्वीकरण

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.

285
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे