म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक का करावी?

 म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक का करावी? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

म्युच्युअल फंडमध्ये कधीच गुंतवणूक करू नये, तर म्युच्युअल फंडमार्फत गुंतवणूक करावी.

सविस्तर सांगायचे झाले तर, आपण आपल्या गरजांप्रमाणे गुंतवणुकीचे विविध मार्ग पत्करतो, जसे भांडवल वाढवण्यासाठी - आपण इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक करतो, भांडवलाच्या सुरक्षेसाठी आणि नियमित मिळकतीसाठी - आपण फिक्स्ड इनकम प्रोडक्ट खरेदी करतो.

बहुतांश गुंतवणूकदारांचा प्रश्न असतो: त्यांच्या साठी योग्य असे उपकरण कसे ओळखावे? या अभ्यासासाठी एखाद्या व्यक्तीकडे तेवढी क्षमता, वेळ किंवा तशी आवड असेलच असे नाही.

गुंतवणुकींचे व्यवस्थापन करण्यासाठी आपण जे करू शकत नाही ते आपण इतरांकरवी करून घेऊ शकतो. आपण 'स्वतःच्या गुंतवणुकींचे व्यवस्थापन’ एखाद्या प्रोफेशनल फर्म सोपवू शकता - म्हणजेच म्युच्युअल फंड कंपनीकडे. निरनिराळ्या उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी म्युच्युअल फंड्सकडे अनेक मार्ग असतात, आणि स्वतःच्या परिस्थिती आणि उद्दिष्टांच्या आधारे गुंतवणूकदार त्यांपैकी निवड करू शकतात.

म्युच्युअल फंड कंपनी अगदी कागदोपत्री कामांसहित सर्व कार्यालयीन कामेही पाहतात. या कंपनी निव्वळ मालमत्ता मूल्य (एनएव्ही) आणि खात्याचे स्टेटमेंट यांच्या द्वारे तुमच्या खात्याचा हिशोब ठेवणे आणि गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओची प्रगती दर्शवणे अशी कामे सुद्धा करतात.

म्युच्युअल फंड अशा लोकांसाठी अतिशय सोयीचे साधन आहे ज्यांना भावी गरजांसाठी गुंतवणूक करायची आहे. पैशाचे व्यवस्थापन व्यावसायिक लोकांचा एक गट करत असतो आणि गुंतवणूकदारांना किचकट कामे न करता त्यांच्या नैपुण्याचा फायदा घेता येतो.

455
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे