तुम्ही लार्ज कॅप म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार का केला पाहिजे?

तुम्ही लार्ज कॅप म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार का केला पाहिजे? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

लार्ज कॅप फंड हे मार्केट कॅपिटलायझेशनच्या आधारे भारतातील टॉपच्या 100 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. जेव्हा तुम्ही या फंडांमध्ये गुंतवणूक करता तेव्हा फंड मॅनेजर्स तुमचे पैसे बऱ्यापैकी जास्त मार्केट कॅपिटलायझेशन असलेल्या नामांकित कंपन्यांमध्ये गुंतवतात. लार्ज कॅप कंपन्यांच्या इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित साधनांमध्ये (इंस्ट्रूमेंट) 80% गुंतवणुकीसह- गुंतवणूकदार हे मजबूत आर्थिक स्थिती असलेल्या बाजारातील अग्रगण्य, स्थिर कंपन्यांचे अप्रत्यक्षपणे भागधारक बनू शकतात. लार्ज कॅप फंड हे लार्ज कॅप कंपन्यांचे स्थैर्य आणि सामर्थ्याच्या जोरावर वेगाने वाढतात. या कंपन्या आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी देखील अधिक सुसज्ज असतात. त्यांच्याकडे सुस्थापित बिझनेस मॉडेल्स, भक्कम आर्थिक पाया आणि बाजारातील जोखमीच्या अधीन राहून दीर्घ काळामध्ये नफा कमावण्याचा सिद्ध ट्रॅक रेकॉर्ड आहे.


लार्ज कॅप फंडांमुळे गुंतवणूकदारांना फंडामेंटली/मूलतः मजबूत कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्यासाठी योग्य वेळ शोधण्याची चिंता करण्याची गरज नाही. कुशल फंड मॅनेजर्स गुंतवणुकीचे निर्णय घेतात, ज्यामुळे तुमचा वेळ आणि कष्ट वाचतात. म्हणूनच, लार्ज कॅप फंडांमध्ये गुंतवणूक केल्याने दोन्ही जगातील सर्वोत्तम गोष्टींचा लाभ मिळतो: गुंतवणुकीची कमी रक्कम आणि तज्ञ व्यवस्थापन. थोडक्यात, लार्ज कॅप फंडामध्ये गुंतवणूक केल्यास मुलांचे शिक्षण किंवा निवृत्तीचे नियोजन इत्यादींसारख्या तुमच्या दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी बाजारातील जोखमींच्या अधीन राहून तुलनेने स्थिर भांडवल वाढ मिळू शकते.
 
अस्वीकरण
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.

284
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे