लहान गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड्स ही आदर्श गुंतवणूक आहे का?

लहान गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड्स ही आदर्श गुंतवणूक आहे का? zoom-icon
म्युच्युअल फंड कैलकुलेटर

म्युच्युअल फंड सही आहे?

हो! मर्यादित बचत असलेल्या किंवा लहान सुरुवात असलेल्या गुंतवणुकदारांसाठी म्युच्युअल फंड्स हे आदर्श गुंतवणुकीचे साधन आहे.

मोठा किंवा लहान, जवळजवळ प्रत्येक गुंतवणुकदाराचे बचत खाते(SB) असते, असे खाते असणारा कोणीही म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणुक करण्यास सुरुवात करु शकतो. कमीत कमी रु 500 दर महिना, अशी नियमित गुंतवणुक करण्याची म्युच्युअल फंड्स चांगली सवय लावतात.

म्युच्युअल फंड्स मध्ये लहान गुंतवणूकदारांसाठी- असलेले इतर फायदे 

  1. व्यवहारातील सहजता-गुंतवणूक, मूल्यमापन, व्यवस्थापन आणि  म्युच्युअल फंड्स स्किम ची विक्री करणे ह्या सगळ्यासाध्या प्रक्रिया आहेत.
  2. सहजपणे रोख रक्कम मिळवणे(लिक्विडीटी), जास्तीत जास्त पारदर्शकता आणि प्रकटीकरण, खात्याचा वेळोवेळी दिला जाणारा ताळेबंद हिशोब(अकाऊंट स्टेटमेंट) आणि करलाभ ह्या सगळ्यांचाच लहान गुंतवणुकदार सगळ्यात आधी विचार करतात
  3. म्युच्युअल फंड्समधील लाभांश  हे गुंतवणुकदारासाठी करमुक्त असतात.
  4. ज्याने 500 रुपये गुंतवले आहेत त्यालाही आणि 5 कोटी गुंतवले आहेत त्याला सुद्धा, म्युच्युअल फंड प्रत्येकासाठी सारखीच कामगिरी करतात. त्यामुळे, ह्यामध्ये लहान असो किंवा मोठा, प्रत्येक गुंतवणुकदाराचा फायदा आहे.
  5. व्यावसायिक व्यवस्थापन, वैविध्यपूर्ण व्यापक पोर्टफोलिओ ज्याने रु 500 महिन्याला गुंतवले आहेत त्याच्यासाठीही असतो.

सुरुवातीची गुंतवणुकीची रक्कम कितीही कमी असो किंवा कितीही मर्यादित उद्दिष्ट असो त्याने काहीही फरक पडत नाही, म्युच्युअल फंड्स सही है.

456
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे