गोल एसआयपी (SIP) कॅल्क्युलेटर
तुमच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेली मासिक SIP गुंतवणूक शोधा.
मासिक SIP रक्कम₹0
तुमची एकूण गुंतवणूक₹0
मासिक SIP रक्कम₹0
तुमची एकूण गुंतवणूक₹0
अस्वीकरण
- भूतकाळातील कामगिरी प्रमाणे भविष्यातील कामगिरी असेल किंवा नसेल आणि ती भविष्यातील परताव्याची हमी देत नाही.
- कृपया नोंद घ्या की हे कॅल्क्युलेटर केवळ उदाहरणादाखल आहेत आणि ते प्रत्यक्ष परतावे दर्शवत नाहीत.
- म्युचुअल फंड्सवर नियत मिळकतीचा दर (फिक्स्ड रेट ऑफ रिटर्न) मिळत नाही आणि मिळकतीच्या दराचे (रेट ऑफ रिटर्न) अनुमान लावणे अशक्य असते.
- म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.
इतर कॅल्क्युलेटर

तुमच्या मासिक SIP गुंतवणुकीचे भविष्यातील मूल्य अंदाजित करा.

तुमच्या चालू गुंतवणुकीचा विचार करून SIP किंवा लंपसम रक्कम मोजून तुमची आर्थिक उद्दिष्टे नियोजित करा.

तुमच्या सध्याच्या खर्चावर आणि भविष्यातील उद्दिष्टांवर महागाईचा परिणाम मोजा.

तुमची गुंतवणूक पुढे ढकलण्याचा विचार करत आहात?
तुमचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या मिळकतीवर होणार्या परिणामांचा विचार करा.
गोल SIP बद्दल अधिक जाणून घ्या
कॅल्क्युलेटर वापरण्याचे फायदे




बहुतेक गुंतवणूकदार गुंतवणुकीची सुरुवात करण्यापूर्वी ठराविक कालावधीत एक टार्गेट रक्कम गाठण्याचे उद्दिष्ट ठेवतात. म्युच्युअल फंडाच्या सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) अंतर्गत, गुंतवणूकदार दर महिन्याला SIP साठी गुंतवणुकीची रक्कम आणि गुंतवणुकीचा कालावधी ठरवू शकतात.
या SIP गुंतवणुकीचे विश्लेषण करण्यासाठी गुंतवणूकदार सहज "गोल-बेस्ड एसआयपी (SIP) कॅल्क्युलेटर" वापरू शकतात.
गोल-बेस्ड एसआयपी (SIP) कॅल्क्युलेटर म्हणजे काय?
गोल-बेस्ड एसआयपी (SIP) कॅल्क्युलेटर एक सहज आणि उपयुक्त ऑनलाइन टूल आहे, जो तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीच्या संभाव्य मैच्योरिटी वैल्यूचा (वेल्थ अक्युमुलेशन गोल) अंदाज घेण्यास मदत करतो. हा टूल तुम्ही गुंतवणूक सुरू करण्याआधीच वापरू शकता.
हा कॅल्क्युलेटर पूर्व-प्रोग्राम केलेल्या अल्गोरिदमवर काम करतो, जो तुम्ही दिलेल्या माहितीनुसार (जसे की - टार्गेट कॉर्पस, गुंतवणुकीचा कालावधी आणि अपेक्षित परतावा दर) अंदाजे निकाल दर्शवतो. मात्र, एसआयपी (SIP) कॅल्क्युलेटर फक्त संभाव्य अंदाज दर्शवतो आणि प्रत्यक्ष परताव्याची खात्री देत नाही, कारण म्युच्युअल फंड्स बाजाराच्या जोखमींशी संबंधित असतात. म्हणूनच, त्याला फ्युचर व्हॅल्यू कॅल्क्युलेटर असेही म्हणतात.
गोल-बेस्ड एसआयपी (SIP) कॅल्क्युलेटर कसा काम करतो?
एसआयपी (SIP) कॅल्क्युलेटर वापरणे खूप सोपे आहे आणि तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे SIP ची रक्कम दाखवतो. तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्सच्या मदतीने गोल-बेस्ड एसआयपी (SIP) कॅल्क्युलेटरचा वापर करू शकता:
स्टेप 1: टार्गेट रक्कम प्रविष्ट करा, जी तुम्हाला SIP द्वारे मिळवायची आहे.
स्टेप 2: गुंतवणुकीचा कालावधी निवडा.
स्टेप 3: अपेक्षित वार्षिक परतावा (%) प्रविष्ट करा.
त्यानंतर, तुम्हाला तुमची एकूण गुंतवणूक रक्कम आणि मासिक SIP गुंतवणूक किती करावी लागेल हे स्क्रीनवर दिसेल.
योग्य मासिक SIP रक्कम आणि गुंतवणुकीचा कालावधी ठरवणे तुमच्या आर्थिक उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाचे आहे, आणि हा कॅल्क्युलेटर त्यामध्ये मदत करू शकतो.
गोल-बेस्ड एसआयपी (SIP) कॅल्क्युलेटरचे फायदे
गोल-बेस्ड एसआयपी (SIP) कॅल्क्युलेटर वापरण्याचे प्रमुख फायदे पुढीलप्रमाणे आहेत:
1. हा एक फ्युचर व्हॅल्यू कॅल्क्युलेटर आहे: हा गोल-बेस्ड एसआयपी (SIP) कॅल्क्युलेटर भविष्यातील संभाव्य गुंतवणूक मूल्य दाखवतो, ज्यामुळे तुम्ही अधिक नियोजनबद्ध गुंतवणूक करू शकता.
2. मॅन्युअल गणनांमध्ये लागणारा वेळ वाचवतो: दरमहा किती SIP गुंतवणूक करावी लागेल हे स्वतः हिशोब करणे वेळखाऊ आणि क्लिष्ट असू शकते. हा कॅल्क्युलेटर कमी वेळेत अचूक उत्तर देतो.
3. मानवी चुकांपासून बचाव करतो: मॅन्युअल गणनेत चुका होऊ शकतात, परंतु या गोल-बेस्ड एसआयपी (SIP) कॅल्क्युलेटरमुळे त्यापासून बचाव करता येतो.
4. गुंतवणुकीची रणनीती ठरवण्यास मदत करतो: तुम्हाला तुमच्या टार्गेट कॉर्पससाठी दरमहा किती SIP गुंतवणूक करावी लागेल हे समजून घेण्यास मदत करतो. परिणामी, तुम्ही तुमच्या गुंतवणुकीला योग्य दिशा देऊ शकता.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
गोल-बेस्ड एसआयपी (SIP) कॅल्क्युलेटर एक ऑनलाइन टूल आहे, ज्याचा उपयोग गुंतवणूकदार त्यांच्या टार्गेट मैच्योरिटी रक्कमसाठी आवश्यक असलेली SIP गुंतवणूक किती असावी हे समजण्यासाठी करू शकतात.