मी ₹ 500 पासून सुरुवात करून, नंतर त्यामध्ये भर टाकत राहू शकतो का?

मी ₹ 500 पासून सुरुवात करून, नंतर त्यामध्ये भर टाकत राहू शकतो का?

म्युच्युअल फंड सही आहे?

संपत्ती निर्माण करण्यासाठी गुंतवणुकीची सर्वात प्रचलित संकल्पना म्हणजे ‘लवकरात लवकर सुरुवात करणे . नियमित गुंतवणूक करा. अधिक काळ गुंतवणूक करा’. जरी गुंतवणूक ₹ 500 इतकी कमी असली, तरी त्यामुळे प्रवासाची सुरुवात होत आहे हे महत्वाचे आहे.

आपण जसे पुढे जाल, तसे गुंतवणुकीची रक्कम वाढविण्यासाठी अनेक मार्ग आहेत. एका म्युच्युअल फंड स्किम मध्ये, आपण एकाच फंड किंवा खात्यामध्ये अतिरिक्त खरेदी करू शकता. अनेक फंड हाऊसेस मध्ये, ही रक्कम 100 रुपये इतकी कमी देखील असू शकते आणि ती हस्तांतरित करता येते किंवा इतर एका स्किम्स मधून दुसरीमध्ये स्थलांतरित करता येते. आपण सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) पासून सुरुवात करू शकता, जो बँकेमधील आवर्ती ठेवीप्रमाणे(रिकरिंग डीपॉझिट), एखाद्या स्किममध्ये नियमित गुंतवणुक करण्यासारखा असतो. त्याचबरोबर, अनेक एएमसीज (AMC) त्यांच्या गुंतवणूकदारांना त्यांच्या खात्यातील एसआयपी रक्कम वार्षिक पगाराप्रमाणे किंवा उत्पन्न वाढीप्रमाणे प्रत्येक वर्षी क्रमाक्रमाने वाढवण्याची मुभा देतात. 

म्युच्युअल फंड्स, हे आजच्या व्यस्त जगात , त्यांच्या परिवर्तनशीलतेमुळे आणि सोयिस्करपणामुळे आदर्श गुंतवणुकीचे साधन ठरले आहेत.

456
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे