सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) म्हणजे काय?

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) म्हणजे म्युच्युअल फंड्सने गुंतवणुकीसाठी सुरू केलेला मार्ग आहे ज्यात आपण एखाद्या म्युच्युअल फंड स्किम्स मध्ये नियमित कालावधीने एक निश्चित रक्कम गुंतवू शकता - जसे महिन्यातून एकदा किंवा तीन महिन्यांतून एकदा, अशाने आपल्याला एकरकमी गुंतवणूक करावी लागत नाही. यासाठी किमान रु. 500 दरमहा रक्कम गुंतवली जाऊ शकते आणि हे एखाद्या आवर्त ठेवी सारखेच आहे. जर आपण आपल्या बँकेला दर महिन्याला ठराविक रक्कम डेबीट करण्याचे निर्देश दिले तर ते फार सोयीस्कर ठरेल. 

भारतातील म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांमध्ये एसआयपीची लोकप्रियता वाढत आहे, कारण याने शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करता येते आणि बाजाराच्या चढ-उतारांची आणि बाजाराच्या वेळेची काळजी करण्याची गरज नसते. म्युच्युअल फंडचे सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन्स दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्याचा सर्वात चांगला मार्ग आहेत. दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणे फार महत्त्वाचे आहे, म्हणूनच आपल्याला गुंतवणूक करणे लवकर सुरू करायला पाहिजे ज्याने आपल्याला शेवटी परतावा अधिक मिळेल. तर आपला कानमंत्र असायला हवा - लवकर सुरू करा, नियमितपणे गुंतवणूक करा आणि आपल्या गुंतवणुकीचा पुरेपूर फायदा घ्या.

456
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे