आपल्या आवडीप्रमाणे दीर्घ काळ आणि अल्प काळासाठी असलेल्या गुंतवणूकीच्या योजना

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

म्युच्युअल फंड अल्पकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम आहेत की दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी?

"अल्पकालीन बचतीसाठी म्युच्युअल फंड एक चांगले साधन ठरु शकतात.”

"आपल्याला आपल्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीबद्दल संयम बाळगावा लागतो. चांगले परिणाम साधण्यासाठी वेळ लागतो."

मग म्युच्युअल फंड कुठल्या कालावधीसाठी योग्य आहेत?

असे दोन परस्पर-विरोधी प्रश्न लोकांना नेहमी भेडसावत असतात. अल्पकालीन की दीर्घकालीन?

आपली गुंतवणुकउद्दिष्टे काय आहेत, त्यावर हे अवलंबून आहे, आणि बहुतांश उद्दीष्टे कालावधीवर अवलंबून असतात. अल्पकाळासाठी योग्य ठरतील अशाही स्किम्स आहेत, दीर्घकाळासाठी योग्य ठरतील अशाही स्किम्स आहेत, आणि तसेच यामधील कुठल्याही कालावधीसाठी स्किम्स उपलब्ध आहेत.

आपल्या म्युच्युअल फंड वितरकाचा किंवा गुंतवणुक सल्लागाराचा सल्ला घ्या, आपल्या आर्थिक उद्दीष्टां विषयी चर्चा करा, आणि नंतर ठरवा की आपल्याला गुंतवणुक कुठे करायची आहे. उदाहरणार्थ;

  1. इक्विटी-ओरीएंटेड म्युच्युअल फंड्स - दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी, बहुधा 5 वर्षे आणि अधिक.
  2. फिक्स्ड इन्कम ओरीएंटेड म्युच्युअल फंड्स
    1. लिक्विड फंड्स - खूप कमीत कमी अल्पकालीन - 1 वर्षापेक्षा कमी
    2. शॉर्ट टर्म बाँड फंड्स – मध्यमकालीन - 1 ते 3 वर्षे.
    3. लॉंग टर्म बाँड फंड्स - दीर्घकाळासाठी - 3 वर्षे किंवा अधिक
       

आपण जर आमच्या वेबसाईटला भेट दिलीत, तर तिथे आपल्याला विविध प्रकारच्या म्युच्युअल फंड्सबद्दल माहिती मिळू शकेल. आपल्या ध्येयांप्रमाणे म्युचुअल फंड वितरक / गुंतवणूक सल्लागार आपणास गुंतवणुकीसाठी योग्य प्रकारचे म्युचुअल फंड सुचविण्यास मदत करू शकतात!

455
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे