स्मार्ट गोल कॅल्क्युलेटर

आपल्या सध्याच्या गुंतवणुकीचा विचार करता, आवश्यक असलेल्या एसआयपी किंवा एकरकमी (लंपसम) रकमेचा
हिशेब करून आपल्या आर्थिक ध्येयाचे नियोजन करा.

लक्ष्य (टार्गेट) रक्कम
वर्षे
%
गुंतवलेल्या रकमेचे भविष्यातील मूल्य ₹54.74 लाख
आपले ध्येय गाठण्यासाठी शिल्लक असलेली रक्कम ₹45.26 लाख
परताव्याचा गृहीत धरलेला दर %
मासिक SIP निवेश करण्याची रक्कम ₹9,060.48
लक्ष्य (टार्गेट) रक्कम
वर्षे
%
एसआयपी मधील गुंतवणूकींचे अंतिम मूल्य ₹49.96 लाख
आपले ध्येय गाठण्यासाठी शिल्लक असलेली रक्कम ₹50.04 लाख
परताव्याचा अपेक्षित दर %
एकरकमी (लंपसम) गुंतवणूक करायची रक्कम ₹9.14 लाख

अस्वीकरण:

भूतकाळातील कामगिरी प्रमाणे भविष्यातील कामगिरी असेल किंवा नसेल आणि ती भविष्यातील परताव्याची हमी देत नाही.

म्युच्युअल फंड योजनेतील प्रत्येक असेट क्लासमध्ये विशिष्ट प्रकारची रिस्क असते.

ऑनलाइन कॅल्क्युलेटर ही आपल्या एसआयपी आणि एकरकमी (लंपसम) गुंतवणुकीचे भविष्यातील मूल्य ठरवण्याची केवळ एक अंदाजे पद्धत आहे. हे कॅल्क्युलेटर कोणत्याही गुंतवणुकीच्या भविष्यातील परताव्याची किंवा कामगिरीची हमी देत नाही, आणि बाजारातील परिस्थिती, करविषयक कायदे आणि इतर घटकांच्या आधारावर प्रत्यक्ष परिणाम भिन्न असू शकतात.

कॅल्क्युलेटर गुंतवणुकीशी संबंधित सर्व फी, शुल्क आणि खर्च कदाचित विचारात घेणार नाहीत, ज्यामुळे परताव्यावर परिणाम होऊ शकतो.

एखादा निर्णय घेण्यापूर्वी आपण स्वतः विश्लेषण करणे किंवा आर्थिक सल्लागाराची मदत घेणे उचित असते.

स्मार्ट गोल कॅल्क्युलेटर म्हणजे काय?

स्मार्ट गोल कॅल्क्युलेटर हे एक उपयुक्त साधन आहे जे आपल्या इच्छित कालावधीमध्ये आपली लक्ष्यित रक्कम साध्य करण्यासाठी आपण एकरकमी किंवा एसआयपी किंवा दोन्हीच्या संयोजनातून किती पैसे गुंतवावेत हे निर्धारित करण्यात मदत करते.

आपली लक्ष्य रक्कम, गुंतवणुकीचा कालावधी आणि अपेक्षित परतावा यासारखे काही आवश्यक तपशील दिल्यास, हे कॅल्क्युलेटर एकरकमी आणि एसआयपी मधील गुंतवणूक यांच्यामध्ये आदर्श वाटप कसे करावे याची गणना करतो.

स्मार्ट गोल कॅल्क्युलेटर कसे कार्य करते?

स्मार्ट गोल कॅल्क्युलेटरचा प्रभावीरीत्या वापर करण्यासाठी, आपल्याला आपल्या गुंतवणूक योजनेबद्दल नेमकी माहिती देणे आवश्यक असते:

  • लक्ष्य रक्कम: आपण आपल्या गुंतवणुकीद्वारे साध्य करू इच्छित असलेली लक्ष्य रक्कम प्रविष्ट करा. गुंतवणुकीचा कालावधी: आपले आर्थिक उद्दिष्ट ज्या कालावधीमध्ये गाठायचे आहे तो कालावधी निर्दिष्ट करा.
  • एकरकमी रक्कम: जर आपण एकरकमी गुंतवणुकीची योजना आखत असाल (आणि गुंतवणूक करावयाची एसआयपीची रक्कम पाहू इच्छित असाल), तर आपण सुरुवातीला गुंतवणूक करू इच्छित असलेली रक्कम प्रविष्ट करा.
  • एसआयपी रक्कम: जर आपण सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) द्वारे नियमित गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत असाल (आणि गुंतवणूक करावयाची एकरकमी रक्कम पाहू इच्छित असाल तर) नियमित गुंतवणुकीची रक्कम द्या.
  • परताव्याचा अपेक्षित दर: आपल्याला आपल्या गुंतवणुकीवर अपेक्षित असलेला अंदाजित सरासरी वार्षिक परताव्याचा दर निवडा.

आपण एकदा हे तपशील प्रविष्ट केले की कॅल्क्युलेटर आपल्याला दाखवेल की आपण किती पैसे एकरकमी म्हणून लगेचच गुंतवले पाहिजेत आणि आपल्या निवडलेल्या कालावधीमध्ये आपले इच्छित आर्थिक उद्दिष्ट गाठण्यासाठी एसआयपीद्वारे नियमितपणे किती गुंतवणूक करावी लागेल.

स्मार्ट गोल कॅल्क्युलेटर समजून घेणे

या कॅल्क्युलेटरचे कार्य स्पष्ट करण्यासाठी, एक उदाहरण1 पाहू या.

समजा आपले निवृत्तीचे उद्दिष्ट रु 1 कोटी आहे. पुढील महिन्यात, आपल्याला ५ लाख रुपयांचा बोनस मिळेल, आणि आपण ही रक्कम वापरून आपल्या निवृत्तीसाठी बचत सुरू करू इच्छिता. तथापि, निवृत्तीपर्यंत आपल्याकडे फक्त 15 वर्षे शिल्लक आहेत हे लक्षात घेता, आपण जाणता की ही एकरकमी आपल्या लक्ष्य गाठण्यासाठी पुरेशी नाही. आपल्याला हे समजते की आपल्याला आणखी गुंतवणूक करावी लागेल, परंतु दुसरी एकरकमी गुंतवणूक करता येणे शक्य नाही. यात चांगली गोष्ट अशी आहे की आपण सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) ची निवड करू शकता आणि दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवू शकता.

आता, असा प्रश्न उद्भवतो: आपले सेवानिवृत्तीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण दर महिन्याला आणखी किती गुंतवणूक केली पाहिजे?

आपले लक्ष्य 1 कोटी रुपये जमा करण्याचे आहे. 12% परतावा अपेक्षित असताना आपण 15 वर्षांसाठी एकरकमी 5 लाख रुपये आधीच गुंतवले आहेत. परंतु, कॅल्क्युलेटर तुमच्या सध्याच्या गुंतवणुकीच्या आधारे अंतिम अंदाजित मूल्य रु. 27,36,782.88 इतके दर्शवते, ज्यातून रु. 72,63,217.12 कमी असल्याचे दिसून येते.

आता, मासिक एसआयपी गुंतवणुकीद्वारे हा फरक भरून काढण्यासाठी उपाय शोधूया. गुंतवणूक योजना 12% च्या अपेक्षित परताव्यासह तशीच राहील.

जेव्हा आपण हे आकडे कॅल्क्युलेटरमध्ये टाकता, तेव्हा आपल्याला आपल्या इच्छित उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी रु. 14,539 च्या मासिक एसआयपीद्वारे गुंतवणूक करण्याची आवश्यकता असल्याचे दिसून येते.

तसेच, जर आपण एसआयपीद्वारे गुंतवणूक करत असाल परंतु आपले लक्ष्य साध्य करणे कठीण वाटत असेल, तर आपण आपल्या सेवानिवृत्तीच्या गुंतवणुकीला एकरकमी रकमेची जोड देण्याचा विचार करू शकता. हे सर्व तपशील कॅल्क्युलेटरमध्ये प्रविष्ट करून, ते आपल्याला आपल्या इच्छित कालावधीसाठी गुंतवलेली अतिरिक्त एकरकमी रक्कम ठरवण्यात मदत करू शकते, ज्यामुळे आपण आपली लक्ष्य रक्कम वेळेवर साध्य करू शकता.

डिस्क्लेमर:

1. कृपया नोंद घ्या की हे कॅल्क्युलेटर केवळ उदाहरणादाखल आहेत आणि ते प्रत्यक्ष परतावे दर्शवत नाहीत.

2. म्युचुअल फंड्‌सवर नियत मिळकतीचा दर(फिक्स्ड रेट ऑफ रिटर्न) मिळत नाही आणि मिळकतीच्या दराचे(रेट ऑफ रिटर्न) अनुमान लावणे अशक्य असते.

3. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.