मी माझी आर्थिक उद्दिष्टे कशी साध्य करू शकतो?

मी माझी आर्थिक उद्दिष्टे कशी साध्य करू शकतो? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

सुरुवात करताना आपल्या गुंतवणूक गरजांनुसार योग्य स्किम निवडणे महत्वाचे आहे. आता हेच बघूया.

प्रवास करताना आपण तो कोणत्या वाहनाने करायचा हे आपण कसे ठरवतो? आपण चालत जाणार आहात, का रिक्षाने जाणार, रेल्वेने प्रवास करायचा की विमानाने, हे सर्व आपले पोहोचण्याचे ठिकाण, होणार्‍या खर्चाचा अंदाज आणि आपल्याकडे उपलब्ध असलेला वेळ यावर सर्व अवलंबून असते.

आपल्या आर्थिक उद्दिष्टांचे नियोजन करण्यासाठी देखील हेच तत्व वापरले जाते.

प्रवासाच्या वेगवेगळ्या गरजांसाठी वेगवेगळी वाहने-वेगवेगळ्या गरजांसाठी वेगवेगळ्या स्किम्स(वेगवेगळ्या स्किम्सचे संयोजन).

अल्पकालीन गरजांसाठी आपण लिक्विड फंड्सचा; मध्यम कालीन गरजांसाठी इन्कम फंड्सचा आणि इक्विटी फंड्सचा(किंवा वेगवेगळ्या फंड्सचे संयोजन) विचार करू शकता. वेगवेगळे गुंतवणूकदार ते पत्करु शकत असलेल्या जोखमीच्या आधारावर एकाच मालमत्ता विभागाच्या वेगवेगळ्या स्किम्समध्ये गुंतवणूक करू शकतात. 

लक्षात ठेवा, म्युच्युअल फंड्समध्ये, गुंतवणूकदाराच्या प्रत्येक गरजेनुसार अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कोणता पर्याय योग्य आहे हे शोधण्यासाठी प्रत्येकाने स्वतःची वेगळी गरज ओळखणे महत्त्वाचे आहे.

459
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे