लिक्विड फंड म्हणजे काय?

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

डावीकडील व्हिडिओ पाहाताना, आपल्याला दिसेल की सर्वच परिस्थितींमध्ये पैसा काही काळासाठी तसाच पडून आहे. काही वेळा, पैसे काढून घेण्याचा नक्की कालावधी कुठला हेच माहीत नसते. अशावेळी गुंतवणूकदाराने काय करावे? हा पैसा कुठे ठेवावा?

इथे काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे:

  1. पैसा फार कमी कालावधीसाठीच ठेवला जाईल
  2. गुंतवलेला पैशाचे मूल्य कमी न होता 
  3. पैसा जिथे सुरक्षित राहील याची खात्री असेल मग त्यात मिळणारा परतावा कमी असला तरी चालेल अशा ठिकाणीच ठेवावा
  4. मग कालावधी नक्की नसेल किंवा माहिती सुद्धा नसेल

वरील चार अटींमुळे, मुदत ठेवीमध्ये पैसा ठेवणे योग्य ठरु शकते, पण त्यालाही काही मर्यादाआहेत. मुदत ठेवीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यामध्ये पैसा सुरक्षित असतो. पण त्यातीलच एक मर्यादेला आपण ब-याचदा दुर्लक्षित करतो की पैसे एका निश्चित कालावधीसाठीच ठेवता येतात – पैसे ठेवण्याच्या कालावधीमध्ये कोणतीही परिवर्तनशीलता नसते.

अशा परिस्थितीमध्ये लिक्विड म्युच्युअल फंडड्सचा विचार केला जाऊ शकतो. व्हिडिओमध्ये सांगितलेल्याप्रमाणे, यांत पैशाची सुरक्षा असते, माफक प्रमाणात चांगला परतावा मिळतो (सेव्हिंग खाते किंवा कमी कालावधीच्या मुदत ठेवीच्या तुलनेत) आणि पैसे केव्हाही काढून घेण्याची मुभा असते.

453
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे