वापराच्या अटी आणि गोपनीयता नोटीस

www.mutualfundssahihai.com. ला भेट देण्यासाठी धन्यवाद। आम्ही आपल्या गोपनीयतेचा सन्मान करतो आणि याला आमच्या सेवेचा एक महत्त्वाचा घटक मानतो. आमचे गोपनीयता धोरण अगदी सोपे आहे: आपण आमच्या वेबसाईटवर आल्यानंतर जोपर्यंत आपण आम्हाला स्वेच्छेने ती माहिती देत नाही तोपर्यंत आम्ही आपल्याबद्दलची वैयक्तिक माहिती संकलित करत नाही.

जेव्हा आपण फक्त पाहाण्यासाठी, लेख वाचण्यासाठी किंवा माहिती डाउनलोड करण्यासाठी आमच्या वेबसाईटवर येता, तेव्हा आम्ही आपसूकच आपल्या भेटी संबंधी काही विशेष माहिती संकलित करून ठेवतो. या विशेष माहितीद्वारे आपली खाजगी ओळख पटू शकत नाही, आणि पटत नाही. आपसूक गोळा केलेल्या माहितीमध्ये सामील आहे: आपण वापरत असलेल्या ब्राउझरचा प्रकार (उदाहरणार्थ, इंटरनेट एक्सप्लोरर, फायरफॉक्स इत्यादी), आपण वापरत असलेल्या ऑपरेटिंग सिस्टिमचा प्रकार (उदाहरणार्थ विंडोज किंवा मॅक ओएस) आणि आपल्या इंटरनेट सेवा प्रदात्याचे डोमेन नाव, आपल्या भेटीची तारीख आणि वेळ आणि आपण कुठली पाने पाहिलीत याची माहिती. आम्ही काही वेळा अशा खाजगी ओळख न पटवून देणाऱ्या माहितीचा वापर आमच्या वेबसाईटचे डिझाइन, मजकूर सुधारण्यासाठी आणि आपल्याला अधिक चांगला ब्राउझिंगचा अनुभव देण्यासाठी करतो.

कुकीजचे धोरण

आम्ही या साईटवर "कुकीज” वापरतो. पण, या कुकीज वापरल्यामुळे कुठल्याही प्रकारची खाजगी माहिती आमच्या साईटला मिळत नाही. कुकी म्हणजे असा डेटा असतो ज्याला साईटवर येणाऱ्या विज़िटर कॉम्प्युटरच्या हार्ड ड्राइव्हमध्ये संग्रहीत केले जाते आणि ज्यामुळे विज़िटरने या आधी पाहिलेल्या वेबसाईटचा एक्सेस सुधारला जातो. कुकीज ब्राउझिंगची माहिती देण्यात मदत करतात.

जर आपण आमच्या वेवसाईटला भेट दिलीत, तर आपल्या कॉम्प्युटरवर या कुकीजच्या माध्यमाने माहिती संग्रहीत केली जाऊ शकते ज्यामुळे आपण आमच्या होम पेजवर पुन्हा जेव्हा याल, तेव्हा आम्ही आपल्या कॉम्प्युटरला ओळखू शकू. यामुळे आम्ही आपल्याला एक सुधारित ब्राउझिंगचा अनुभव देऊ शकतो.

जर आमच्या वेबसाईटकडून आपल्या मशीनमध्ये कुकीज ठेवणे आपल्याला मान्य नसेल, तर कृपया आपल्या इंटरनेट ब्राउझरला अशा प्रकारे सेट करा ज्याने कुकीज काढून टाकल्या जातील किंवा कुकीज ब्लॉक केल्या जातील किंवा आपल्याला अशा वेबसाईटबद्दल सांगितले जाईल ज्या कुकीज वापरतात.