ELSS (ईएलएसएस) फंड- कर बचत करणारा म्युच्युअल फंड

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

ELSS (ईएलएसएस) ही इक्विटीशी निगडीत सेव्हिंग स्किम आहे.ज्यामुळे एखाद्या व्यक्तीस किंवा हिंदु अविभाजित कुटुंबास (HUF) एकूण उत्पन्नावर 1.5 लाखापर्यंत आयकर कायदा 1961 च्या सेक्शन 80 सी नुसार लाभ मिळू शकतो.

म्हणजे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने रु. 50,000 ELSS मध्ये गुंतवले असतील तर त्याच्या एकूण कर पात्र उत्पन्नातून सदर रक्कम वजा करुन त्याच्यावरील करभार कमी होतो.

युनिट्स दिल्याच्या तारखेपासून ह्या स्किम्स मध्ये तीन वर्षाचा लॉक-इन कालावधी असतो. लॉक-इन कालावधी संपल्यानंतर, युनिट्सची विक्री किंवा स्थलांतरण करणे शक्य असते. ELSS मध्ये ग्रोथ आणि डिव्हिडंट हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. गुंतवणूकदार सिस्टीमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन्स (SIP) च्या माध्यमातून गुंतवणूक करु शकतो, आणि आर्थिक वर्षात ह्यात केलेली 1.5 लाखापर्यंतची गुंतवणूक ही कर वजावटीसाठी योग्य असेल.

453
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे