विलंब किंमत (कॉस्ट ऑफ डिले) कॅल्क्युलेटर
तुमची गुंतवणूक पुढे ढकलण्याचा विचार करत आहात?
तुमचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या मिळकतीवर होणार्या परिणामांचा विचार करा.
विलंब रक्कम₹1.27 लाख
गुंतवणूकीची एकुण वर्षे
आजच गुंतवणूक करा
10 वर्षे
नंतर गुंतवणूक करा
5 वर्षे
गुंतवणूकीची एकुण रक्कम
आजच गुंतवणूक करा
₹1.20 लाख
नंतर गुंतवणूक करा
₹60,000
तुमच्या गुंतवणुकीची अंतिम किंमत
आजच गुंतवणूक करा
₹2.05 लाख
नंतर गुंतवणूक करा
₹77,437.07
संपत्ती बनवणे
आजच गुंतवणूक करा
₹84,844.98
नंतर गुंतवणूक करा
₹17,437.07
डिस्क्लेमर
- भूतकाळातील कामगिरी प्रमाणे भविष्यातील कामगिरी असेल किंवा नसेल आणि ती भविष्यातील परताव्याची हमी देत नाही.
- कृपया लक्षात ठेवा, हा कॅल्क्युलेटर केवळ उदाहरणादाखल आहे आणि प्रत्यक्ष मिळकत दर्शवत नाही.
- म्युच्युअल फंडांच्या परताव्याचा निश्चित दर नसतो आणि परताव्याच्या दराचा अंदाज देखील बांधता येत नाही. *येथे दर्शविलेल्या मूल्यावर महागाईचा होणारा परिणाम विचारात घेतला जात नाही.
- कृपया नोंद घ्या की हे कॅल्क्युलेटर केवळ उदाहरणादाखल आहेत आणि ते प्रत्यक्ष परतावे दर्शवत नाहीत.
- म्युचुअल फंड्सवर नियत मिळकतीचा दर (फिक्स्ड रेट ऑफ रिटर्न) मिळत नाही आणि मिळकतीच्या दराचे (रेट ऑफ रिटर्न) अनुमान लावणे अशक्य असते.
- म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.
इतर कॅल्क्युलेटर

तुमच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेली मासिक SIP गुंतवणूक शोधा.

तुमच्या चालू गुंतवणुकीचा विचार करून SIP किंवा लंपसम रक्कम मोजून तुमची आर्थिक उद्दिष्टे नियोजित करा.

तुमच्या सध्याच्या खर्चावर आणि भविष्यातील उद्दिष्टांवर महागाईचा परिणाम मोजा.

तुमच्या खर्चाच्या आणि उद्दिष्ट गाठण्यासाठी आवश्यक मासिक गुंतवणुकीच्या आधारे तुमचा रिटायरमेंट निधी अंदाजित करा.
विलंब किंमतीबद्दल अधिक जाणून घ्या
कॅल्क्युलेटर वापरण्याचे फायदे




विलंब किंमत (कॉस्ट ऑफ डिले) म्हणजे काय?
विलंब किंमत म्हणजे गुंतवणूक काही वर्षे पुढे ढकलल्याने लागणारी अतिरिक्त रक्कम.
विलंब किंमत (कॉस्ट ऑफ डिले) कॅल्क्युलेटर म्हणजे काय?
विलंब किंमत (कॉस्ट ऑफ डिले) कॅल्क्युलेटर, तुम्हाला तुमच्या सिस्टेमॅटिक गुंतवणुकीला विशिष्ट कालावधीपर्यंत उशीर केल्याचे परिणाम समजावून सांगण्यासाठी मदत करतो. तुम्ही तुमची गुंतवणूक सुरू करण्यास उशीर केल्यास तुमचे ध्येय गाठण्यासाठी आवश्यक असलेले अतिरिक्त रक्कम जाणून घेण्यास तो तुम्हाला मदत करतो.
हा कॅल्क्युलेटर हे दाखवतो की, गुंतवणुकीचा लहानसा विलंबदेखील दीर्घकालीन गुंतवणुकीवर मोठा परिणाम करु शकतो, म्हणूनच गुंतवणूक ताबडतोब सुरू करणे आर्थिक यशासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
लोक गुंतवणूक लांबणीवर का टाकतात?
गुंतवणूक लांबणीवर टाकण्यासाठी कारण ठरणारे मुख्य घटक असतात :
- अपुरे आर्थिक ज्ञान
- स्पष्ट उद्दिष्टे आणि नियोजन नसणे
- कामे पुढे ढकलण्याची सवय
- अनावश्यक खर्चाच्या सवयी
- जोखीम घेण्याची भीती
गुंतवणुक लांबणीवर टाकल्याचे लक्षणीय परिणाम होऊ शकतात :
- बाजारात गमावलेल्या वेळेमुळे दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी अपुरा निधी
- तुमच्या पैशाची खरेदीची शक्ती कमकूवत होणे
- तुम्ही चक्रवाढीच्या शक्तीचा वापर करण्यास मुकू शकता.
विलंब किंमत (कॉस्ट ऑफ डिले) कॅल्क्युलेटर कधी वापरावा?
गुंतवणूक लांबणीवर टाकण्याचा विचार करताना विलंब किंमत (कॉस्ट ऑफ डिले) कॅल्क्युलेटर वापरण्याचा विचार करा. या विलंबामुळे गुंतवणुकीच्या आवश्यक रकमेत किती फरक पडतो ते पाहण्यास हा मदत करतो, ज्यामुळे तुम्ही तत्काळ गुंतवणूक करण्याचा पर्याय आणि गुंतवणूक लांबणीवर टाकण्याचा पर्याय यांची तुलना करू शकता आणि प्रत्यक्ष आकडे पाहून समंजसपणे निर्णय घेऊ शकता.
विलंब किंमत (कॉस्ट ऑफ डिले) कॅल्क्युलेटर वापरण्याचे फायदे
- ठराविक वेळेसाठी असलेल्या संधींचे मूल्यांकन करा: ठराविक वेळेसाठी असणाऱ्या गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये लगेच गुंतवणूक करणे किंवा विलंब करणे आर्थिकदृष्ट्या लाभदायक आहे का ते ठरवा.
- दीर्घकालीन वृद्धीचे विश्लेषण करा: नियमित गुंतवणूक लांबणीवर टाकल्याने वृद्धीचे आणि चक्रवाढीचे फायदे संभाव्यत: किती गमवाल ते पाहा.
- गुंतवणुकीच्या पर्यायांची तुलना करा: वेगवेगळ्या कालमर्यादांसाठी किंवा संभाव्य उत्पन्न मिळवण्यासाठी विविध पर्यायांमधील गुंतवणुक लांबणीवर टाकण्याची किंमत पहा आणि त्याची तुलना करा.
विलंब किंमत (कॉस्ट ऑफ डिले) कॅल्क्युलेटर कसा काम करतो?
हा कॅल्क्युलेटर आधी ठरवलेल्या फॉर्म्युलाच्या (सूत्राच्या) आधारे काम करतो. तो बाजारातील चढउतार किंवा उत्पन्नावर बाहेरून प्रभाव टाकणारे घटक विचारात घेत नाही.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
गुंतवणुकीस उशीर केल्याच्या किंमतीचा कॅल्क्युलेटर माहिती प्राप्त निर्णय घेण्यास मदत करतो. गुंतवणुका लांबणीवर टाकण्याचे परिणाम तो उदाहरणातून दाखवून देतो. त्यामुळे तुम्हाला गुंतवणूक सुरु करण्याची परिपूर्ण वेळ ठरवण्यास आणि तुमच्या आर्थिक उद्दीष्टांच्या दिशेने काम सुरु करण्यास मदत होते.