Skip to main content

सिस्टेमॅटिक विदड्रॉल प्लॅन (SWP) कॅल्क्युलेटर

गुंतवणुकीमधून व्याजासह नियमित निश्चित रक्कम काढल्यानंतर अंतिम मूल्य मोजा.

वर्षे
%

अंतिम गुंतवणूक मूल्य0

एकूण मिळालेले व्याज

0

एकूण विदड्रॉ

0

डिस्क्लेमर

  1. भूतकाळातील कामगिरी प्रमाणे भविष्यातील कामगिरी असेल किंवा नसेल आणि ती भविष्यातील परताव्याची हमी देत नाही.
  2. कृपया लक्षात ठेवा, हा कॅल्क्युलेटर केवळ उदाहरणादाखल आहे आणि प्रत्यक्ष मिळकत दर्शवत नाही.
  3. म्युचुअल फंड्‌सवर नियत मिळकतीचा दर (फिक्स्ड रेट ऑफ रिटर्न) मिळत नाही आणि मिळकतीच्या दराचे (रेट ऑफ रिटर्न) अनुमान लावणे अशक्य असते.
  4. म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजार जोखमींच्या अधीन असतात. गुंतवणुकीपूर्वी सर्व संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.

इतर कॅल्क्युलेटर

goal sip calculator
गोल एसआयपी (SIP) कॅल्क्युलेटर

तुमच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेली मासिक SIP गुंतवणूक शोधा.

आत्ताच कॅल्क्युलेट करा
smart goal calculator
स्मार्ट गोल कॅल्क्युलेटर

तुमच्या चालू गुंतवणुकीचा विचार करून SIP किंवा लंपसम रक्कम मोजून तुमची आर्थिक उद्दिष्टे नियोजित करा.

आत्ताच कॅल्क्युलेट करा
inflation calculator
इन्फ्लेशन (महागाई) कॅल्क्युलेटर

तुमच्या सध्याच्या खर्चावर आणि भविष्यातील उद्दिष्टांवर महागाईचा परिणाम मोजा.

आत्ताच कॅल्क्युलेट करा
Cost of delay calculator
विलंब किंमत (कॉस्ट ऑफ डिले) कॅल्क्युलेटर

तुमची गुंतवणूक पुढे ढकलण्याचा विचार करत आहात?
तुमचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या मिळकतीवर होणार्‍या परिणामांचा विचार करा.

आत्ताच कॅल्क्युलेट करा

कॅल्क्युलेटर वापरण्याचे फायदे

finance-planning
सहज आर्थिक नियोजन
finance-planning
वेळेची बचत
easy-to-use
वापरण्यास सोपे
helps-make-informed-decisions
माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत

सिस्टेमॅटिक विदड्रॉल प्लॅन (SWP) म्हणजे काय?

सिस्टेमॅटिक विदड्रॉल प्लॅन (SWP) ही म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील एक टेक्निक आहे ज्यामध्ये गुंतवणूकदारांना नियमितपणे ठराविक रक्कम काढता येते, सहसा मासिक, तिमाही किंवा वार्षिक आधारावर. गुंतवणूकदार त्यांच्या इच्छेनुसार महिना, तिमाही किंवा वर्षातील कोणताही ठराविक दिवस निवडू शकतात, ज्याद्वारे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी (AMC) ठरवलेल्या रकमेची गुंतवणूकदाराच्या नोंदणीकृत बँक खात्यात हस्तांतरण करते.

सिस्टेमॅटिक विदड्रॉल प्लॅन (SWP) कॅलक्युलेटर म्हणजे काय?

SWP (सिस्टमॅटिक विदड्रॉल प्लॅन) कॅलक्युलेटर हा आर्थिक साधन आहे जो गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीतून ठराविक काळात नियमित पैसे काढल्यास त्यांच्या गुंतवणुकीची कामगिरी कशी असेल हे अंदाज लावण्यास मदत करतो. गुंतवणूकदारांना त्यांच्या नियमित विदड्रॉलसाठी योजना आखण्यास मदत करतो, ज्यात एकूण काढलेल्या रकमेचे, उरलेल्या शिल्लक रकमेचे आणि अपेक्षित परताव्याचे आकलन मिळते.

गुंतवणूकदार नियमितपणे ठराविक रक्कम काढण्याची शक्यता तपासू शकतात, विविध विदड्रॉल फ्रिक्वेन्सीज आणि रक्कम त्यांच्या गुंतवणूक शिल्लकवर कसा परिणाम करतात हे समजू शकतात, त्यांच्या गुंतवणुकीची वाढ क्षमता अंदाजे करू शकतात, आणि अंदाजित विदड्रॉलच्या आधारावर त्यांच्या कॅश फ्लो आणि बजेटिंगची योजना आखू शकतात, ज्यामध्ये महागाई आणि बाजार जोखमींचा विचार केला जातो.

SWP कॅलक्युलेटर हे गुंतवणूकदारांसाठी खूप उपयोगी साधन आहे ज्यांना त्यांच्या कॅश फ्लोचे व्यवस्थापन करायचे आहे, निवृत्तीची योजना आखायची आहे, किंवा त्यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमधून शाश्वत उत्पन्न प्रवाह निर्माण करायचा आहे

SWP कॅलक्युलेटर कसे कार्य करते?

SWP कॅलक्युलेटर वापरणे अगदी सोपे आहे. नवीन आणि अनुभवी गुंतवणूकदारांसाठी हे ऑनलाइन साधन उपयुक्त आहे. यामध्ये खालील माहिती भरावी लागते:

a) एकूण गुंतवणूक रक्कम

b) मासिक/तिमाही/वार्षिक विदड्रॉल रक्कम

c) वार्षिक परताव्याचा अंदाजित दर

d) गुंतवणूक कालावधी

ही माहिती भरल्यानंतर, SWP कॅलक्युलेटर तुमच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या अंदाजित भविष्यातील किंमतीची गणना करतो. ही अंदाजपत्रक (प्रोजेक्शन) गुंतवणूकदारांना SWP ची आराखणी आणि निर्णय प्रक्रिया सुलभ करते. त्यांच्या गुंतवणुक रणनीतीच्या संभाव्य परिणामांचे दृश्यीकरण करण्यास मदत करते.

सिस्टमॅटिक विदड्रॉल प्लॅनरिटर्न्स कॅलक्युलेट करण्याचा फॉर्मुला

SWP रिटर्न्स कॅलक्युलेट करण्यासाठी हा फॉर्मुला वापरले जातो:

A = PMT ((1+r/n)^nt-1)/(r/n)

इथे:

'A' म्हणजे तुमच्या गुंतवणुकीची अंतिम किंमत.

'PMT' म्हणजे प्रत्येक कालावधीतली पेमेंट रक्कम.

'n' म्हणजे कंपाऊंडिंग फ्रिक्वेन्सी.

't' म्हणजे गुंतवणुकीचा कालावधी.

उदाहरण:

जर तुम्हाला खालील माहितीच्या आधारे सिस्टेमॅटिक विदड्रॉल प्लॅन (SWP) योजना चालवायची असेल:

  • प्रारंभिक गुंतवणूक रक्कम: रु. 5,00,000
  • कालावधी: 5 वर्षे
  • मासिक विदड्रॉल: रु. 8,000
  • अपेक्षित परताव्याचा दर: 12%

वरील सूत्रानुसार, तुमच्या गुंतवणुकीचे परिणाम असे असतील:

  • एकूण गुंतवणूक: रु. 5,00,000
  • एकूण विदड्रॉल: रु. 4,80,000
  • अंतिम मूल्य: रु. 2,38,441

कृपया लक्षात घ्या की अंतिम रक्कम ही आपण पाच वर्षांसाठी अपेक्षित मासिक रक्कम काढल्यानंतर शिल्लक राहणारी रक्कम आहे, ज्यासाठी 12% परतावा अपेक्षित मानला आहे.

म्युच्युअल फंड्स सही आहे (MFSH) SWP कॅलक्युलेटर कसा वापरायचा?

MFSH SWP कॅलक्युलेटर वापरण्यासाठी, खालील माहिती भरा:

  • प्रारंभिक गुंतवणूक रक्कम
  • गुंतवणूक कालावधी
  • अपेक्षित परताव्याचा दर
  • मासिक विदड्रॉल रक्कम

कॅलक्युलेटर तुमची अंदाजित एकूण गुंतवणूक मूल्य, मिळालेले व्याज, एकूण विदड्रॉल रक्कम आणि अंतिम गुंतवणूक मूल्य दर्शवेल.

SWP कॅलक्युलेटरचे फायदे

MFSH SWP कॅलक्युलेटर गुंतवणूकदारांना निर्णय घेण्यासाठी आणि त्यांच्या गुंतवणूक धोरणांना ऑप्टिमाइझ करण्यासाठी अनेक फायदे देतो. कसे ते पाहा

a. आर्थिक नियोजन : कॅलक्युलेटर गुंतवणूकदारांना त्यांचे आर्थिक लक्ष्य आणि गरजेनुसार विदड्रॉल रक्कम आणि फ्रिक्वेन्सी ठरवण्यासाठी मदत करते.

b. वास्तविक अपेक्षा ठरवणे : सिस्टेमॅटिक विदड्रॉल प्लॅन (SWP) कॅल्क्युलेटर गुंतवणुकीची स्थिरता आणि नियमित विदड्रॉल द्वारे उत्पन्न होणारी संभाव्य आयची यथार्थ अंदाज प्रदान करते, ज्यामुळे गुंतवणूकदारांना साध्य होणारे लक्ष्य ठरवण्यास मदत होते.

c. भावनावश (इम्पल्सिव्ह) विदड्रॉल करणे टाळणे : SWP कॅलक्युलेटरचा वापर करून, गुंतवणूकदार बाजारातील मंदी किंवा अनपेक्षित चढ-उताराच्या काळात आकस्मिक पैसे काढण्यापासून टाळू शकतात, ज्यामुळे गुंतवणुकीच्या धोरणात शिस्तबद्ध दृष्टिकोन राखता येतो.

d. कॅशफ्लो ऑप्टिमाइझ करणे : कॅलक्युलेटर गुंतवणूकदारांना विदड्रॉल रक्कम आणि फ्रिक्वेन्सी समायोजित करून त्यांच्या कैश फ्लोचा सर्वोत्तम वापर करण्यास सक्षम करतो, ज्यामुळे त्यांच्या गुंतवणुकीचे संसाधन (रिसोर्सेज) कार्यक्षमतेने वापरले जातात.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

नियमित कॅशफ्लो गरजांसाठी SWP उपयुक्त ठरू शकतो. मात्र, या उद्देशासाठी निधीची उपयुक्तता व्यक्तीच्या जोखमीची सहनशीलता आणि लिक्विडिटी प्राधान्यांवर अवलंबून असते.