Skip to main content

रिटायरमेंट प्लानिंग कॅल्क्युलेटर

तुमच्या खर्चाच्या आणि उद्दिष्ट गाठण्यासाठी आवश्यक मासिक गुंतवणुकीच्या आधारे तुमचा रिटायरमेंट निधी अंदाजित करा.

वर्षे
वर्षे
वर्षे
%
%
%

रिटायरमेंटनंतर आवश्यक असलेली एकूण कॉर्पस/राशि0

निवृत्तीनंतर लगेचच आवश्यक असलेले वार्षिक उत्पन्न

0

कॉर्पस/राशि जमा करण्यासाठी आवश्यक असलेली मासिक बचत

0

अस्वीकरण

  1. भूतकाळातील कामगिरी प्रमाणे भविष्यातील कामगिरी असेल किंवा नसेल आणि ती भविष्यातील परताव्याची हमी देत नाही.
  2. कृपया नोंद घ्या की हे कॅल्क्युलेटर केवळ उदाहरणादाखल आहेत आणि ते प्रत्यक्ष परतावे दर्शवत नाहीत.
  3. म्युचुअल फंड्‌सवर नियत मिळकतीचा दर (फिक्स्ड रेट ऑफ रिटर्न) मिळत नाही आणि मिळकतीच्या दराचे (रेट ऑफ रिटर्न) अनुमान लावणे अशक्य असते.
  4. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.

इतर कॅल्क्युलेटर

goal sip calculator
गोल एसआयपी (SIP) कॅल्क्युलेटर

तुमच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेली मासिक SIP गुंतवणूक शोधा.

आत्ताच कॅल्क्युलेट करा
smart goal calculator
स्मार्ट गोल कॅल्क्युलेटर

तुमच्या चालू गुंतवणुकीचा विचार करून SIP किंवा लंपसम रक्कम मोजून तुमची आर्थिक उद्दिष्टे नियोजित करा.

आत्ताच कॅल्क्युलेट करा
inflation calculator
इन्फ्लेशन (महागाई) कॅल्क्युलेटर

तुमच्या सध्याच्या खर्चावर आणि भविष्यातील उद्दिष्टांवर महागाईचा परिणाम मोजा.

आत्ताच कॅल्क्युलेट करा
Cost of delay calculator
विलंब किंमत (कॉस्ट ऑफ डिले) कॅल्क्युलेटर

तुमची गुंतवणूक पुढे ढकलण्याचा विचार करत आहात?
तुमचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या मिळकतीवर होणार्‍या परिणामांचा विचार करा.

आत्ताच कॅल्क्युलेट करा

कॅल्क्युलेटर वापरण्याचे फायदे

finance-planning
सहज आर्थिक नियोजन
saves-time
वेळेची बचत
easy-to-use
वापरण्यास सोपे
helps-make-informed-decisions
माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत

MFSH रिटायरमेंट प्लानिंग कॅल्क्युलेटर

प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीसाठी रिटायरमेंटचे नियोजन महत्त्वाचे असते. रिटायरमेंट योजना तयार करण्याची प्रक्रिया हि उत्पन्नाचे स्रोत ओळखणे, प्रभावी बचत योजना पूर्ण करणे, आवश्यक निधीचा अंदाज लावणे आणि तुमच्या उत्पन्नाचा काही भाग विविध मालमत्तेमध्ये गुंतवणे याभोवती फिरते.

तथापि, एक मजबूत रिटायरमेंट जीवनासाठी योग्य कॅल्क्युलेशन्स करणे आणि तुमच्या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्याचा अंदाज लावणे हा कठीण भाग आहे. रिटायरमेंट कॅल्क्युलेटर अश्या व्यक्तींसाठी उपयोगी पडू शकतो, ज्यांना रिटायरमेंट निधी आवश्यक आहे आणि ते मिळवण्यासाठी त्यांना किती बचत किंवा गुंतवणूक करावी लागेल हे समजून घ्यायचे आहे.

रिटायरमेंट प्लानिंग म्हणजे काय?

रिटायरमेंट प्लानिंग म्हणजे रिटायरमेंटसाठी योग्य आर्थिक तयारी. रिटायरमेंटचे नियोजन करताना, तुम्हाला महागाईचा विचार करणे, रिटायरमेंटनंतरच्या खर्चाचा अंदाज घेणे, रिटायरमेंटच्या कालावधीचा अंदाज घेणे, जोखमींचे मूल्यांकन करणे आणि अभ्यासपूर्ण गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

याशिवाय, जीवनाच्या वाढत्या अपेक्षेसोबत, तुम्ही तुमच्या नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर आर्थिकदृष्टया सुरक्षित असणे ही एक गरज बनली आहे. म्युच्युअल फंड सही आहे मधील रिटायरमेंट प्लानिंग कॅल्क्युलेटर तुम्हाला रिटायरमेंटनंतर आवश्यक असलेल्या निधीची रक्कम आणि रिटायरमेंटपूर्वी आणि रिटायरमेंटनंतरच्या गुंतवणुकीवर तुम्ही किती परतावा देऊ शकता याचे मूल्यांकन करण्यात मदत करू शकते.

MFSH रिटायरमेंट प्लॅनिंग कॅल्क्युलेटर म्हणजे काय?

MFSH रिटायरमेंट कॅल्क्युलेटर हे ऑनलाइन युटिलिटी टूल आहे जे तुम्हाला तुमच्या रिटायरमेंटनंतर किती पैसे लागतील हे दाखवते. तुम्हाला जमा करावयाच्या रिटायरमेंट निधीच्या आधारे तुमच्या गुंतवणुकीचे नियोजन करण्यात हे तुम्हाला मदत करते.

ह्याची तुम्हाला दोन ठिकाणी मदत होऊ शकते आणि ते आहेत:

1. तुमची सध्याची जीवनशैली टिकवून ठेवण्यासाठी तुमच्या रिटायरमेंटनंतर तुम्हाला आवश्यक असलेले पैसे हे तुम्हाला दाखवते.

2. हे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवरील परताव्याचा अंदाज लावण्यास आणि तुमचा रिटायरमेंट निधी जमा करण्यासाठी तुम्ही कशी गुंतवणूक करावी हे समजून घेण्यासाठी मदत करू शकते.

रिटायरमेंट प्लानिंग कॅल्क्युलेटर कसे कार्य करते?

MFSH रिटायरमेंट कॅल्क्युलेटरमध्ये एक फॉर्म्युला बॉक्स आहे जेथे तुम्ही तुमचे वर्तमान वय, तुमचे रिटायरमेंटचे वय, अपेक्षित जीवन आणि रिटायरमेंटनंतर आवश्यक मासिक उत्पन्न प्रविष्ट करू शकता. तुम्हाला अंदाजे महागाई दर, गुंतवणुकीवरील अपेक्षित परतावा आणि तुमच्याकडे सध्या काही बचत असल्यास त्यांची निवड करावी लागेल.

हे तपशील प्रविष्ट केल्यावर, कॅल्क्युलेटर तुम्हाला रिटायरमेंटच्या वेळी आवश्यक असलेले वार्षिक उत्पन्न आणि ही रक्कम प्राप्त करण्यासाठी तुम्हाला किती मासिक बचत करावी लागेल हे सांगेल.

MFSH रिटायरमेंट प्लॅनिंग कॅल्क्युलेटर कसे वापरावे?

फक्त काही स्टेप्स फॉलो करून तुम्ही हा कॅल्क्युलेटर वापरू शकता आणि त्या स्टेप्स खालील प्रमाणे:

स्टेप 1: तुमचे वर्तमान वय प्रविष्ट करा.

स्टेप 2: तुमचे इच्छित रिटायरमेंटचे वय प्रविष्ट करा.

स्टेप 3: तुमचे अपेक्षित जीवन निवडा.

स्टेप 4: तुमच्या रिटायरमेंटच्या वर्षांमध्ये तुम्हाला आवश्यक असलेले मासिक उत्पन्न प्रविष्ट करा.

स्टेप 5: देशातील अंदाजे महागाई दर प्रविष्ट करा.

स्टेप 6: निवृत्तीपूर्व गुंतवणुकीवर अपेक्षित असलेला परतावा प्रविष्ट करा.

स्टेप 7: निवृत्तीनंतरच्या गुंतवणुकीवर अपेक्षित असलेला परतावा प्रविष्ट करा.

स्टेप 8: रिटायरमेंटसाठी बाजूला ठेवलेली कोणतीही वर्तमान बचत किंवा गुंतवणूक इनपुट करा.

हे तपशील प्रदान केल्यावर, तुम्ही कॅल्क्युलेटर डिस्प्ले पाहू शकता:

  • रिटायरमेंटनंतर लागणारे वार्षिक उत्पन्न.
  • अतिरिक्त निधी जमा करणे आवश्यक आहे.
  • आवश्यक कॉर्पस/राशी जमा करण्यासाठी आवश्यक मासिक बचत.

MFSH रिटायरमेंट प्लॅनिंग कॅल्क्युलेटर वापरण्याचे फायदे

हे रिटायरमेंट कॅल्क्युलेटर वापरण्याचे प्राथमिक फायदे आहेत:

हे रिटायरमेंटसाठी बचत करण्यास मदत करते: रिटायरमेंटसाठी बचत 20 आणि 30 च्या दशकात लवकर सुरू करणे आवश्यक आहे. कॅल्क्युलेटर व्यक्तीला सुरुवातीपासूनच आवश्यक रक्कम सांगून बचत कशी करायची आणि गुंतवणूक कशी करायची आणि दिलेल्या मुदतीत ती कशी जमा करायची हे सुचवते.

रिटायरमेंटनंतर आवश्यक असलेली अंदाजे रक्कम जाणून घेण्यास मदत करते: तुम्हाला तुमच्या रिटायरमेंटसाठी नेमके किती पैसे लागतील याचा अंदाज लावणे कठीण आहे आणि हा कॅल्क्युलेटर हे काम सोपे करतो. या व्यतिरिक्त, हे तुम्हाला गुंतवणुकीची रक्कम किंवा बचत सांगते जी तुम्ही या वेळी करावी, जेणेकरून अंदाजे कॉर्पस रक्कम दिलेल्या मुदतीत जमा करता येईल.

हे रिटायरमेंटच्या अतिरिक्त खर्चाची योजना बनविण्यात मदत करते: तुमच्या रिटायरमेंटमध्ये अतिरिक्त खर्च होणार असल्यास, तुम्ही त्यांच्यासाठी आगाऊ योजना बनवू शकता आणि त्यांच्यासाठी तयार राहू शकता, कारण तुम्हाला रिटायरमेंटच्या जीवनात अपेक्षित असलेल्या खर्चांबद्दल आधीच माहिती असते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

MFSH रिटायरमेंट कॅल्क्युलेटर हे एक उपयुक्त ऑनलाइन साधन आहे जे तुम्हाला तुमच्या रिटायरमेंटसाठी किती गुंतवणूक करायची आहे याचा अंदाज लावण्यास मदत करते.