एकरकमी गुंतवणूक कॅल्क्युलेटर

तुमच्या सध्याच्या गुंतवणुकीचा विचार करून, एकरकमी गुंतवणुकीच्या आवश्यक रकमेची गणना करून तुमच्या आर्थिक उद्दिष्टाचे नियोजन करा.

वर्षे
%
%
एकूण गुंतवलेली रक्कम ₹1.27 Lakh
अंतिम कॉर्पस निधी ₹1.27 Lakh
एकूण कॉर्पस निधी (चलनवाढ विचारात घेऊन) ₹1.27 Lakh

अस्वीकरण:

भूतकाळातील कामगिरी प्रमाणे भविष्यातील कामगिरी असेल किंवा नसेल आणि ती भविष्यातील परताव्याची हमी देत नाही.
कृपया नोंद घ्या की हे कॅल्क्युलेटर केवळ उदाहरणादाखल आहेत आणि ते प्रत्यक्ष परतावे दर्शवत नाहीत.
म्युचुअल फंड्‌सवर नियत मिळकतीचा दर(फिक्स्ड रेट ऑफ रिटर्न) मिळत नाही आणि मिळकतीच्या दराचे(रेट ऑफ रिटर्न) अनुमान लावणे अशक्य असते.

%
₹1.27 Lakh
%
वर्षे
गुंतवणुकीची रक्कम
गुंतवणूक करावी लागणारी एकरकमी रक्कम ₹1.27 Lakh

अस्वीकरण:

भूतकाळातील कामगिरी प्रमाणे भविष्यातील कामगिरी असेल किंवा नसेल आणि ती भविष्यातील परताव्याची हमी देत नाही.
कृपया नोंद घ्या की हे कॅल्क्युलेटर केवळ उदाहरणादाखल आहेत आणि ते प्रत्यक्ष परतावे दर्शवत नाहीत.
म्युचुअल फंड्‌सवर नियत मिळकतीचा दर(फिक्स्ड रेट ऑफ रिटर्न) मिळत नाही आणि मिळकतीच्या दराचे(रेट ऑफ रिटर्न) अनुमान लावणे अशक्य असते.

एकरकमी गुंतवणूक म्हणजे काय?

एकरकमी गुंतवणूक, ज्याला वन-टाइम इन्व्हेस्टमेंट असेही म्हणतात, हा गुंतवणुकीचा असा एक प्रकार आहे ज्यात तुम्ही एकदाच गुंतवणूक करता ज्यामुळे तुमच्या गुंतवलेल्या पैशाला दिलेल्या मुदतीत चक्रवाढ व्याजाने परतावा मिळू शकतो.

एकरकमी गुंतवणूक कॅल्क्युलेटर म्हणजे काय?

एकरकमी गुंतवणूक कॅल्क्युलेटर हे एक सॉफ्टवेअर साधन आहे ज्याचा वापर तुम्ही म्युच्युअल फंडातील तुमच्या एकरकमी गुंतवणुकीचे अंदाजे मॅच्युरिटी मूल्य मोजण्यासाठी करू शकता.

सोप्या भाषेत सांगायचे तर म्युच्युअल फंड एकरकमी कॅल्क्युलेटर तुम्हाला ठराविक व्याजदराने आज केलेल्या गुंतवणुकीचे भविष्यातील अंदाजे मूल्य सांगेल.

उदाहरणार्थ, जर तुम्ही 12% व्याजदराने 10 वर्षांसाठी 2 लाख रुपयांची गुंतवणूक केली. एकरकमी परतावा कॅल्क्युलेटरनुसार, तुमच्या गुंतवणुकीचे भविष्यातील मूल्य हा तुमचा कॉर्पस निधी असेल, जो 6,21,169.64 रुपये असेल. परंतु म्युच्युअल फंड्स बाजारातील घडामोडींच्या अधीन असल्याने हे प्रत्यक्ष मूल्य नसून परतावा किती असेल याचा हा केवळ अंदाज आहे.

एमएफएसएच एकरकमी गुंतवणूक कॅल्क्युलेटर कसे वापरावे?

म्युच्युअल फंड्स सही है (एमएफएसएच) एकरकमी गुंतवणूक कॅल्क्युलेटर हे कोणीही वापरू शकेल असे वापरण्यास सोपे ऑनलाइन साधन आहे. एकरकमी गुंतवणूक कॅल्क्युलेटरमध्ये तुम्हाला मूलभूत तपशील टाकावे लागतील, जसे की:

 

अ) सुरुवातीची गुंतवणुकीची रक्कम

ब) परताव्याचा दर

क) गुंतवणुकीची वर्षे (मुदत)

 

हे तपशील या गुंतवणूक कॅल्क्युलेटरमध्ये टाकल्यावर तुम्ही या एकरकमी म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे भविष्यातील अंदाजे मूल्य जाणून घेऊ शकता.

एकरकमी म्युच्युअल फंड परतावा मोजण्याचे सूत्र

तुमच्या म्युच्युअल फंड एकरकमी गुंतवणुकीचे रिडेम्प्शन मूल्य हे वर नमूद केल्याप्रमाणे गुंतवणुकींच्या बाजारातील कामगिरीवर आधारित असेल. मात्र, एकरकमी गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्याचा अंदाज वर्तवण्यासाठी म्युच्युअल फंड एकरकमी कॅल्क्युलेटर हेच सूत्र वापरते. वापरले जाणारे सूत्र असे आहे:

A = P (1 + r/n) ^ nt

 

आर - अंदाजे परतावा

पी - मूळ गुंतवणूक रक्कम

टी - एकूण कालावधी

एन - योगदानांची संख्या

 

उदाहरणासह गणना -

 

मुद्दल: 50,000

परताव्याचा दर: 12%

कालावधी: 10 वर्षे

 

ए = पी (1 + आर/एन) ^ एनटी

= 1.55 लाख रुपये (हे अंदाजे रिडेम्प्शन मूल्य असेल.)

एकरकमी गुंतवणूक कॅल्क्युलेटर तुम्हाला कशी मदत करू शकते?

हे एकरकमी गुंतवणूक कॅल्क्युलेटर तुम्हाला खालील गोष्टींमध्ये मदत करू शकते:

संपूर्ण गुंतवणुकीच्या कालावधीतून अंदाजे परतावा सांगणे.

म्युच्युअल फंड्स हे बाजारातील चढउतारांच्या अधीन असतात आणि त्यांचा अंदाज बांधता येत नसला तरी गुंतवणूक कॅल्क्युलेटर आवश्यक ती गणना (मोजण्यातील मानवी त्रुटींशिवाय) प्रदान करेल.

हे वापरण्यास सुलभ आणि सोपे आहे आणि कॅल्क्युलेटर तुलनेने सोपे केले जातात याची खात्री करते. म्युच्युअल फंड एकरकमी कॅल्क्युलेटर हे सुनिश्चित करते की तुम्ही अंदाजे परताव्याच्या आधारे तुमच्या आर्थिक बाबींचे चांगले नियोजन करता.

हे एकरकमी गुंतवणूक कॅल्क्युलेटर कसे कार्य करते?

म्युच्युअल फंड्स सही है पोर्टलवर उपलब्ध असलेले एकरकमी गुंतवणूक कॅल्क्युलेटर हे त्याच्या आवश्यक स्लॉट्समध्ये दिलेल्या महत्त्वाच्या चल घटकांना (माहितीवर) वरील सूत्र लागू करते आणि काही सेकंदांमध्ये तुम्हाला अंदाजे मूल्य सांगते.

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की प्रत्यक्ष परतावा भिन्न असू शकतो. शुल्क, कर आणि बाजारातील चढउतार यासारखे घटक गुंतवणुकीच्या प्रत्यक्ष कामगिरीवर परिणाम करू शकतात.

एमएफएसएच एकरकमी गुंतवणूक कॅल्क्युलेटर वापरण्याचे फायदे

हे एकरकमी गुंतवणूक कॅल्क्युलेटर हे एक असे आर्थिक साधन आहे ज्याचे बरेच फायदे आहेत, जसे की:

 

1. यामुळे तुम्ही गुंतवणूक करायची रक्कम ठरवू शकता: या अंदाजाच्या आधारे आदर्श मॅच्युरिटी मूल्य प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेली महत्त्वपूर्ण एकरकमी रक्कम तुम्ही जाणून घेऊ शकता.

2. गुंतवणुकीच्या नियोजनाची सुलभता: म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या नियोजनासाठी वापरले जाणारे एक साधन म्हणूनही हे कॅल्क्युलेटर काम करू शकते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न 1. एकरकमी गुंतवणूक हा चांगला पर्याय कसा आहे?

हे गुंतवणूकदाराच्या आर्थिक उद्दिष्टांवर अवलंबून असते, म्हणजे त्यांना एकरकमी स्वरूपात गुंतवणूक करायची आहे की एसआयपीमध्ये. परंतु, दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी एकरकमी गुंतवणूक हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय ठरू शकतो, गुंतवणूकदारांना प्रत्येक कालांतराने पैसे भरण्याची आठवण करून देण्याची गरज नाही,

प्रश्न 2. एकरकमी कॅल्क्युलेटर मला अचूक निकाल देईल का?

कॅल्क्युलेटर तुम्हाला अचूक गणना देईल, परंतु तो गुंतवणुकीचा नेमका परिणाम असलेच असे नाही - कारण म्युच्युअल फंड बाजारातील जोखमीच्या अधीन असतात आणि परताव्याचा अंदाज बांधता येत नाही.

प्रश्न 3: म्युच्युअल फंड्स सही है एकरकमी गुंतवणूक कॅल्क्युलेटरद्वारे वापरले जाणारे सूत्र काय आहे?

या कॅल्क्युलेटरने वापरलेले सूत्र ए = पी (1 + आर/एन) ^ एनटी आहे.

प्रश्न 4: मी एकरकमी गुंतवणुकीस कधी प्राधान्य द्यावे?

बाजारातील मंदीच्या काळात एकरकमी गुंतवणूक करता येते. जेव्हा किंमती कमी असतात, तेव्हा तुम्ही अधिक युनिट्स खरेदी करू शकता, जे तुम्हाला दीर्घ काळासाठी चांगला परतावा देऊ शकतात.