मी माझ्या 8 महिन्यांनंतरच्या सुट्टीसाठी आत्ता गुंतवणूक करू शकतो का?

मी माझ्या 8 महिन्यांनंतरच्या सुट्टीसाठी आत्ता गुंतवणूक करू शकतो का?
म्युच्युअल फंड कैलकुलेटर

म्युच्युअल फंड सही आहे?

म्युच्युअल फंड्स बद्दलचे लेख हे सामान्यतः ठराविक दीर्घकालीन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लिहीलेली असतात, आणि गुंतवणूकदार असा विचार करतात, की इतर उद्दिष्टे जसे की अल्पकालीन उद्दिष्टे यामधून साध्य करता येऊ शकत नाहीत.

चला ही पुराणकथा एका उदाहरणाने मोडूयात.

रमेश हा एक प्रवासप्रेमी आहे, जेव्हा तो काम करत असलेल्या कंपनीने यश मिळवले आणि त्याला बोनस मिळाला, तेव्हा त्याला त्याची भटकण्याची भूक भागवण्याची इच्छा झाली.

ह्या बोनस सह त्याने युरोपच्या सहलीवर जाण्याचे ठरवले, पण त्याच्या एका मोठ्या आणि प्रतिष्ठित प्रकल्पाचे काम अपूर्ण होते आणि त्याची कालमर्यादा संपत आली होती. हा प्रकल्प पुढच्या 8 महिन्यांत पूर्ण होत होता.

रमेशच्या प्रवासाची तारीख ठरत नव्हती. त्याचा खर्च बघता काही रक्कम ही प्रवासाआधी आणि काही प्रवासामध्ये खर्च करावी लागणार होती. कोणत्या तारखेला किती पैसे खर्च करावे लागणार आहेत याबद्दल अनिश्चितता होती.

काही म्युच्युअल फंड स्किम्स या अशा परिस्थितीसाठी आदर्श आहेत.

रमेशने त्याची ही बचत कोणत्याही कामकाजाच्या दिवशी काढून घेता यावी, यासाठी एका लिक्विड फंड मध्ये ठेवणे सगळ्यात उत्तम आहे. त्याने पैसे काढून घेण्याची विनंती केल्यानंतर पुढच्या दिवशी लगेचच पैसे त्याच्या खात्यात जमा होतील. रमेश एसएमएस किंवा अ‍ॅप द्वारे देखील पैसे काढू शकतो.

अल्पकालीन उद्दिष्टांसाठी नियोजन करणे देखील ह्यामधून सोयीस्कर होते.

459
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे