गुंतवणूकदाराच्या फंडचा उपयोग करताना म्युच्युअल फंड मालमत्ता वितरण बदलू शकतात का?

गुंतवणूकदाराच्या फंडचा उपयोग करताना म्युच्युअल फंड मालमत्ता वितरण बदलू शकतात का? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

स्किम माहिती पत्रकानुसार (SID) म्युच्युअल फंड हे वेगवेगळ्या मालमत्ता वर्गामध्ये गुंतवणूक करत असतात. स्किमसाठी असलेल्या अंदाजित मालमत्ता वितरणाची काही उदाहरणे पुढीलपैकी असू शकतात:

  • इक्विडी फंड इक्विटी मध्ये 80% ते 100%, मनी मार्केट(रोखेबाजार) सिक्युरिटीजमध्ये 0% ते 20% गुंतवणूक करत असेल
  • बॅलन्स फंडचे मालमत्ता वितरण कदाचित 65% ते 80% हे इक्विटीमध्ये असेल, 15% ते 35% हे डेब्ट सिक्युरीटीजमध्ये,0% ते 20% हे मनी मार्केट(रोखेबाजार) सिक्युरिटीजमध्ये असेल.

ब-याच वेळा मालमत्ता विभागात केलेले वितरण हे श्रेणी म्हणून नमूद केलेले असते. स्किम माहितीपत्रकात(SID) असलेल्या मर्यादांच्या बाहेर जाऊन निधी व्यवस्थापक मालमत्ता वितरणात कोणताही बदल करु शकत नाही पण मर्यादांचे पालन करुन काही बदल करण्याची परवानगी देण्यात आली आहे. उदाहरणार्थ, इक्विटी मधील, लार्ज-कॅप आणि मिड-कॅप वितरण वर नमूद केलेले नाही, ज्यात वेळोवेळी लार्ज-कॅप आणि मिड-कॅप मधील विविध वितरणामध्ये बदल करुन परिवर्तनशीलता राखता येते. 

जर स्किमच्या मालमत्ता वितरणामध्ये बदल करण्याची गरज असेल तर, फंड व्यवस्थापन कंपनीने फंडच्या विश्वस्त आणि युनिटधारकांकडून तशी मंजुरी घेणे गरजेचे असते. कंपनीला सार्वजनिकरित्या हा बदल घोषित करावा लागतो. अशा स्थितीत, सद्य गुंतवणूकदार कोणताही एक्सिट लोड (निर्गमन भार) न देता 30 दिवसात स्किममधून बाहेर पडू शकतात.

452
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे