म्युच्युअल फंड्स संपत्ती निर्माणामध्ये मदत करू शकतात का?

म्युच्युअल फंड्स संपत्ती निर्माणामध्ये मदत करू शकतात का?

म्युच्युअल फंड सही आहे?

आपण आपला पैसा अशा व्यापार आणि व्यवसायांमध्ये गुंतवून संपत्ती निर्माण करू शकतो जे स्वतः मालमत्ता निर्माणाच्या मार्गावर आहेत. आपल्याला उद्योजकांच्या व्यवसायामध्ये, त्यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून, गुंतवणूकदार बनता येते. असे उद्योजक आणि व्यवस्थापक जसजसे त्यांचा व्यवसाय कार्यक्षमपणे चालवून लाभ मिळवतात, तसतसे त्यांच्या शेअरधारकांना त्याचा फायदा मिळतो. यामुळे संपत्ती निर्माणासाठी म्युच्युअल फंड्स उत्तम मार्ग आहेत.

पण आपल्याला कसे कळणार की केव्हा, कुठले शेअर्स विकत घ्यावे ते?

यासाठीच तर व्यावसायिक लोकांची मदत महत्त्वाची ठरते. म्युच्युअल फंड्सकडे फार मोठी रक्कम उपलब्ध असल्याने ते एकाच वेळी अनेक संधींचा फायदा घेण्यास सक्षम असतात. जसे संतुलित आहारासाठी आपल्याला प्रथिने, जीवनसत्त्वे, कर्बोदके इत्यादींचा गरज असते. यातील एकाचेच सेवन अधिक केल्याने पोषक तत्त्वांची कमतरता भासते. त्याच प्रमाणे, एखाद्या डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडमध्ये आपण अर्थकारणाच्या निरनिराळ्या विभागांच्या संपर्कात येतो, तसेच ते संभाव्य नुकसानापासून सुरक्षित असतात.

एखाद्या व्यावसायिकरित्या व्यवस्थापित असलेल्या, डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक करा आणि दीर्घकाळासाठी गुंतवणूक करून स्वतःसाठी आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी संपत्ती निर्माण करा.

457
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे