म्युचुअल फंड निवडीमध्ये संभ्रम निर्माण होत आहे का?

म्युचुअल फंड निवडीमध्ये संभ्रम निर्माण होत आहे का?

म्युच्युअल फंड सही आहे?

होय, म्युच्युअल फंड स्किम्सचे अनेक प्रकार आहेत - इक्विटी, डेब्ट, रोखे बाजार, हायब्रिड इत्यादी. आणि भारतात अनेक म्युच्युअल फंड्स आहेत ज्यांच्या एकत्रितपणे शेकडो स्किम्स आहेत. त्यामुळे एखादी स्किम निवडणे फारच गुंतागुंतीचे आणि गोंधळात टाकणारे काम आहे.

गुंतवणूक करण्यासाठी स्किम निवडणे हे गुंतवणूकदारासाठी सर्वात शेवटचे काम असले पाहीजे. त्याआधी काही महत्त्वाच्या पाय-या आहेत ज्यामुळे नंतर होणारा गोंधळ कमी होण्यास मदत होते. 

गुंतवणूकदाराकडे सर्वात आधी गुंतवणुकीचे उद्दिष्ट असायला हवे, जसे निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे नियोजन, किंवा घराचे नूतनीकरण. गुंतवणूकदाराने दोन आकडे ठरवले पाहिजेत - यासाठी किती पैसे लागतील, आणि याला किती वेळ लागेल, तसेच आपण किती जोखीम पत्करू शकतो याचाही विचारकेला गेला पाहीजे.

दुसऱ्या शब्दांमध्ये, गुंतवणूकदाराची उद्दिष्ट्ये आणि जोखीमचे स्वरुप यानुसार फंडच्या प्रकाराची शिफारस केली जाते, जसे इक्विटी किंवा हायब्रिड किंवा डेब्ट, आणि नंतरच स्किमच्या मागील कामगिरीचा आढावा, पोर्टफोलिओतील स्थान इत्यादींचा विचार करुन ठराविक स्किमची निवड केली जाते.

थोडक्यात, जर सुरुवातीलाच गुंतवणुकीचे उद्दिष्ट स्पष्ट असले, तर शेवटी कुठला फंड निवडावा यातील गोंधळ फार कमी होतो.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे