इक्विटी फंड आणि डेब्ट फंड मधील जोखमींचे घटक सारखेच असतात का?

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

इक्विटी फंड्स कंपनींच्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करतात, तर डेब्ट फंड कंपनींच्या बाँड्स मध्ये आणि रोखे बाजारातील उपकरणांमध्ये गुंतवणूक करतात. हे फंड आपला पैसा मालमत्तेच्या वेगवेगळ्या प्रकारात गुंतवीत असल्यामुळे, यांच्यावर त्यांतील मालमत्तेवर प्रभाव टाकणार्‍या घटकांचा प्रभाव पडतो.

स्टॉक वर बाजारातील चढ-उताराचा प्रभाव पडतो. त्यामुळे बाजाराचा जोखीम हा इक्विटी फंड साठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. एक्सचेंज दरामधील चढ-उतारांमुळे आंतरराष्ट्रीय फंड्सना चलनाच्या जोखमीला सामोरे जावे लागते. अर्थकारण आणि उद्योगाचा जोखीम इक्विटी फंड्सना अधिक धोका असतो कारण कुठल्याही कंपनीच्या व्यवसाय आणि आर्थिक पर्यावरणावर प्रभाव टाकणाऱ्या घटकांचा प्रभाव थेट त्या कंपनीच्या स्टॉक वर पडत असतो.

व्याज दरातील बदलाचा प्रभाव बाँड वर पडतो कारण बाँड एक प्रकारचे कर्जाचे साधनच आहे. त्यामुळे व्याज दरातील जोखीम हा डेब्ट फंडसाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. बाँड्स बुडविले जाण्याचा त्यांचे क्रेडिट खालावण्याचा धोका असतो, म्हणजेच बाँड जारी करणारा त्याच्या अंतर्गत असलेले पैसे परत करू न शकणे किंवा पैसे परत करू शकण्याची क्षमता कमी करण्याच्या वित्तीय संकटात सापडणे. त्यामुळे डेब्ट फंडला पैसे बुडण्याच्या आणि क्रेडिटच्या जोखमीला फार अधिक सामोरे जावे लागते.

दोन्ही प्रकारच्या फंड्सना लिक्विडिटीची जोखीम देखील असते, म्हणजे फंड व्यवस्थापकाला पोर्टफोलिओ मधील मालमत्तेचा अधिक विनिमय होत नसल्यामुळे किंवा त्या मालमत्तेसाठी मागणी नसल्यामुळे विकता आली नाही असे होऊ शकते.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे