म्युच्युअल फंड्स फक्त स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करतात का?

म्युच्युअल फंड्स फक्त स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करतात का?

म्युच्युअल फंड सही आहे?

आपण मनोरंजन करणाऱ्या ठिकाणांचा विचार करता तेव्हा आपण आकाश पाळणा किंवा खेळण्यातल्या आगगाड्या यांचा विचार करता का? कदाचित पहिला पर्याय. अशा ठिकाणी हे आकाश पाळणा किंवा गाड्या ही सहसा मोठी आकर्षणे असतात त्यामुळे मनोरंजन करणाऱ्या ठिकाणांबद्दल असे विशिष्ट समज निर्माण होतात. म्युच्युअल फंड्स बद्दल देखील असेच समज निर्माण होतात की ते फक्त स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करतात आणि त्यामुळे ते जोखमीचे असतात. इथे लोकांच्या बदलणाऱ्या गुंतवणुकांच्या आवश्यकतांसाठी अनेक प्रकारचे म्युच्युअल फंड्स असतात. काही गुंतवणूकदारांना मोठे परतावे हवे असतात जे फक्त स्टॉक्सच देऊ शकतात. असे गुंतवणूकदार इक्विटी फंड्स मध्ये गुंतवणूक करू शकतात ज्या अशी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी असलेल्या सर्वोत्तम दीर्घकालीन गुंतवणूक पर्यायांपैकी एक आहे. पण अशा म्युच्युअल फंड्स मध्ये ते वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्टॉक्स साठी खुले असल्या कारणाने जास्त अस्थिरतेची जोखीम असते.

इथे इतर काही प्रकारचे म्युच्युअल फंड्स आहेत जे इक्विटी मध्ये गुंतवणूक करत नाहीत तर बँक, कंपनी आणि सरकारी संस्था यांनी जारी केलेल्या बाँड्स तसेच मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स (बँक सीडीज, टी-बिल्स, कमर्शियल पेपर्स) मध्ये गुंतवणूक करतात, ज्यामध्ये तुलनेने कमी जोखीम असते पण इक्विटी फंड्सच्या तुलनेत कमी परतावे असतात. हे फंड्स बँकेच्या मुदत ठेवी किंवा पीपीएफ या पारंपारिक पर्यायांच्या ऐवजी अधिक योग्य आहेत. म्हणून आपण बँकेच्या किंवा पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेवीपेक्षा अधिक चांगला परतावा देणाऱ्या आणि तरीही करामधील अधिक लाभ देणाऱ्या पर्यायांचा विचार करत असाल, तर डेब्ट म्युच्युअल फंड्स हे अशी आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी असलेले उत्तम मार्ग आहेत.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे