ध्येय-आधारित गुंतवणूक : तुमच्या प्रत्येक ध्येयासाठी एसआयपी गुंतवणूक

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

जीवनात आपली प्रत्येकाची ध्येये वेगवेगळी असतात. कधीकधी ती अचानक समोर येतात, कधीकधी ती ठराविक कालावधीने समोर येतात. उदाहरणार्थ, आपण काम करायला सुरुवात करतो, तेव्हा मनात महिन्याचा नेहमीचा खर्च आणि उत्स्फूर्तपणे केलेली थोडी खरेदी ह्यापलीकडे कदाचित जास्त काही नसतं. पण अखेरीस, नवीन ध्येयं उभी राहतात - एखादी बाइक किंवा कार, वीकेंडला बाहेर जाणं, परदेशी फिरून येणं, लग्न, आणि इतर सगळ्या गोष्टी.

आता एक उपाय आहे जो आपल्या आर्थिक ध्येयांसाठी प्लॅनिंग करायला आपल्याला मदत करू शकतो, आणि आपल्या आयुष्यात नव्याने उदयाला येणाऱ्या ध्येयांसाठीही सज्ज करू शकतो:

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी)
तुम्ही एसआयपी मार्फत दरमहा एक छोटी रक्कम गुंतवू शकता. फक्त एवढंच नाही, तुम्ही ध्येय-आधारित गुंतवणुक सुद्धा सुरु करू शकता; म्हणजेच प्रत्येक ध्येयासाठी तुम्ही एक एसआयपी सुरु करून  निवृत्ती, लग्न, आणि अगदी कार किंवा घर खरेदी सारख्या विविध ध्येयांसाठी म्युच्युअल फंडमधील चक्रवाढीच्या शक्तीचा वापर करू शकता. ह्या शक्तीमुळे तुमच्या उत्पन्नावर तुम्ही भविष्यात आणखी उत्पन्न कमवू शकता - गुंतवणूकदाराला मिळणारे एकूण उत्पन्न चक्रवाढीने वाढते. तुम्ही चक्रवाढीच्या शक्तीबद्दल इथे आणखी वाचू शकता

उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती ध्येय-आधारित गुंतवणुकीची सुरुवात अशी करू शकते:

ध्येय रक्कम गुंतवणुकीचा कालावधी म्युच्युअल फंड स्कीम अपेक्षित उत्पन्न* गुंतवणुकीची रक्कम
रु 1 लाख 2-3 वर्षे डेट फंड 6-8% दरमहा रु. 2,500
रु 4 लाख 5 वर्षे बॅलन्स्ड फंड 10% दरमहा रु. 5,000
रु 25 लाख 10 वर्षे इक्विटी फंड 12% दरमहा रु. 10,000
रु 10 लाख 15 वर्षे इक्विटी फंड 12% दरमहा रु. 2,000
रु 30 लाख 20 वर्षे इक्विटी फंड 12% दरमहा रु. 3,000
रु 1.5 कोटी 20 वर्षे डेट फंड 8% रु 30 लाख (लंपसम)

*म्युच्युअल फंड प्रवर्गासाठी गृहीत धरलेले उत्पन्नटीप:
केवळ उदाहरणाच्या हेतुकरिता; प्रत्यक्ष आकडे बाजारातील जोखमींच्या अधीन असून वेगळे असू शकतात.

काही वर्षांनी, तुम्ही तुमच्या प्रत्येक ध्येयासाठीच्या दीर्घकालीन एसआयपी गुंतवणुकीची रक्कम बदलू शकता. उदाहरणार्थ, एकदा तुम्ही गाडी विकत घेण्याचं स्वप्न साकार केलंत, की तुम्ही इतर ध्येयांसाठी एसआयपीची रक्कम प्रत्येकी रु. 2000 ने वाढवू शकता. असे करून, तुम्ही सुरुवातीला अपेक्षित असल्यापेक्षा तुमच्या ध्येयांसाठी जास्त संपत्ती गोळा करू शकता.
निवृत्तीनंतर, तुम्हाला कमी जोखमीच्या फंडमध्ये तुमच्या गुंतवणुका वळवाव्याशा वाटू शकतात, उदाहरणार्थ कमी जोखमीची डेट(ऋण) साधने(इंस्ट्रूमेंट) ज्यांमधून तुमच्या जोखमीत घट होते. ह्यांमधून निवृत्ती नंतरही उत्पन्न मिळत राहू शकते. आणि सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन मार्फत तुम्हाला ह्या गुंतवणुकांमधून उत्पन्नाचा दुसरा स्रोतही मिळण्यास मदत होऊ शकते. 

अशाप्रकारे, तुमच्या ध्येयांनुसार योग्यकाळासाठी विविध म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी मार्फत गुंतवणूक केल्याने तुम्हाला आयुष्यातील तुमची सर्व स्वप्नं आणि ध्येयं विविध वेळी साध्य करता येतील. 

*म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमींच्या अधीन असते, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.

मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे