टारगेट मॅच्युरिटी फंड आणि FMP मध्ये काय फरक आहे?

टारगेट मॅच्युरिटी फंड आणि FMP मध्ये काय फरक आहे? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

डेब्ट म्युच्युअल फंडच्या गुंतवणूकदारांसमोर दोन प्रमुख जोखमी असतात, व्याज दराची जोखीम आणि क्रेडिटची जोखीम. दीर्घ कालावधीच्या G-Sec म्हणजे शासकीय रोख्यांमध्ये क्रेडिटची जोखीम फारच कमी असते, तरीही त्यांत व्याज दराची जोखीम असतेच. तर दुसरीकडे कमी कालाधीच्या फंडमध्ये, म्हणजे लिक्विड फंडमध्ये व्याज दराची जोखीम अधिक चांगल्या पद्धतीने हाताळली जाते, पण त्यामध्ये क्रेडिट क्वालिटीची जोखीम अधिक असते.

FMP आणि टारगेट मॅच्युरिटी फंड दोन्हीमध्ये मॅच्युरिटीची तारीख आधीपासून निश्चित असते त्यामुळे त्यांना "विकत घ्या आणि धरून ठेवा” हे धोरण वापरून व्याज दराची जोखीम कमी करता येते. तरीही, काही बाबतीत FMP च्या तुलनेत टारगेट मॅच्युरिटी फंड अधिक योग्य असतात. व्याज दराच्या जोखमीच्या व्यतिरिक्त, FMP च्या तुलनेत त्यांना क्रेडिट जोखीम अधिक चांगल्या पद्धतीने व्यवस्थापित करता येते कारण त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये सरकारी सिक्युरिटीज, राज्य विकास कर्ज आणि AAA रेटिंग असलेले PSU बाँड असतात.

FMP क्लोज-एंडेड फंड असतात आणि ते एक्सचेंजवर लिस्ट केलेले असले तरीही त्यांत कमी व्यवहार असल्यामुळे लिक्विडिटी कमी असते. टारगेट मॅच्युरिटी बाँड फंड ओपन-एंडेड असल्यामुळे यामध्ये लिक्विडिटी अधिक चांगली असते. टारगेट मॅच्युरिटी फंड तीन विभिन्न प्रकारांत उपलब्ध आहेत - टारगेट मॅच्युरिटी बाँड इंडेक्स फंड आणि टारगेट मॅच्युरिटी बाँड ETF. अशा प्रकारे, टारगेट मॅच्युरिटी फंडमध्ये फंडच्या प्रकारांप्रमाणे गुंतवणूकदारांसाठी अधिक पर्याय असतात.

निष्क्रिय असल्यामुळे FMP च्या तुलनेत टारगेट मॅच्युरिटी फंडचा खर्चाचा अनुपात कमी असतो कारण तिथे फंड व्यवस्थापकांना पोर्टफोलिओ स्वतः तयार करावा लागतो. टारगेट मॅच्युरिटी फंडमध्ये मॅच्युरिटीच्या तारखेचे सुद्धा अनेक पर्याय उपलब्ध असतात, हे पर्याय 3-10 वर्षे एवढे असू शकतात, तर FMP मध्ये साधारणपणे हा कालावधी 1-3 वर्षे असतो. त्यामुळे दीर्घ कालावधीच्या गुंतवणूकदारांसाठी FMP योग्य असतीलच असे नाही.

क्लोज-एंडेड असल्यामुळे FMP, टारगेट मॅच्युरिटी फंडपेक्षा एकाच बाबतीत अधिक चांगले असतात. यांत लिक्विडिटी कमी असल्यामुळे गंभीर गुंतवणूकदारांना या फंडमध्ये मॅच्युरिटीपर्यंत टिकून रहावेच लागते आणि त्यामुळे व्याज दराची जोखीम कमी असते. टारगेट मॅच्युरिटी फंड ओपन-एंडेड असले तरीही त्याचा अर्थ असा होत नाही की आपण त्यामध्ये मॅच्युरिटीपर्यंत टिकून राहू नये. जर आपण तसे केले नाही, तर परतावा लॉक-इन करणे आणि व्याज दराच्या जोखमीपासून संरक्षण करणे याला काहीच अर्थ रहात नाही. म्हणूनच, टारगेट मॅच्युरिटी फंड अशा गुंतवणूकदारांसाठीच योग्य आहेत जे फंडच्या मॅच्युरिटीच्या तारखेपर्यंत टिकून राहू शकतात आणि ज्यांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट फंडच्या मॅच्युरिटीच्या तारखेप्रमाणे असते.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे