ईटीएफची निवड कशी करावी?

ईटीएफची निवड कशी करावी? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

इतर गुंतवणुकींप्रमाणेच, ईटीएफची निवड आपल्या मालमत्ता वितरणावर, वित्तीय उद्दिष्टांवर, जोखीमेच्या प्राधान्यांवर आणि कालावधीवर अवलंबून असते. आपण ईटीफ आपल्या पोर्टफोलिओमध्ये जोडून आपले मालमत्ता वितरण कशा स्वरूपाचे करू इच्छिता यावर ईटीएफची निवड अवलंबून असते, कारण ईटीएफ अनेक वेगवेगळ्या मालमत्ता प्रकारात जसे की इक्विटी, बाँड, स्थावर मालमत्ता, व्यापारी इ. मध्ये उपलब्ध आहेत. आधी आपल्याला ईटीएफचा मालमत्ता प्रकार ठरवा.

आपण विविधीकरण कसे करू इच्छिता आणि कुठल्या इंडेक्सचा आपल्याला माग घ्यायचा आहे ते ठरवा. किमान जोखीम पत्करून कमाल विविधीकरण करण्यासाठी बाजाराच्या एखाद्या विस्तृत इंडेक्सचा माग घेणारा ईटीएफ योग्य असतो. जर आपण जोखीम पत्करू इच्छित असाल आणि बाजाराच्या एका सोयीच्या विभागामध्ये, उद्योगात किंवा देशामध्ये गुंतवणूक करणार असलात, तर विशिष्ट ईटीएफ निवडा. 

ईटीएफच्या पोर्टफोलिओकडे लक्ष द्या ज्यामुळे आपल्याला कळेल की तो आपल्याला कोणत्या प्रकारची कामगिरी देऊ शकेल. आपण मालमत्तेच्या वर्गांतर्गत माग घेण्यातील त्रुटी कमी असेलेले आणि आपल्याला ज्या विभागाचा पाठपुरावा करायचा आहे असे ईटीएफ निवडावेत. कमी ट्रेड होत असलेले ईटीएफ निवडू नका कारण त्यांचा बिड/ आस्क स्प्रेड अधिक असतो ज्यामुळे आपला विनिमयाचा खर्च वाढेल आणि ईटीएफ मधून मिळणारा परतावा कमी होईल. बाजाराच्या लहानशा विभागाचा माग घेणारे किंवा कमी मालमत्ता (एयूएम) असलेले ईटीएफ कमी लिक्विड(रोख रक्कम देणारे) असतात आणि अशा किमतीवर ट्रेड केले जातात जी त्यांच्या एनएव्हीप्रमाणे नसते. असे ईटीएफ पाहा जे त्यांच्या एनएव्हीच्या जवळच्या किमतीवर ट्रेड केले जातात. 

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे