डायरेक्ट प्लॅनमध्ये गुंतवणूक कशी करतात

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

काही लोकांना म्युच्युअल फंड सोपे वाटतात तर काहींना ते समजायला फार कठीण वाटू शकतात. एखादा म्युच्युअल फंड कशा प्रकारे काम करतो आणि त्याच्याशी कशा प्रकारच्या जोखमी निगडित आहेत हे नवीन गुंतवणूकदारांना समजेलच असे नाही. आज मार्केटमध्ये हजारोच्या संख्येने म्युच्युअल फंड स्कीम उपलब्ध असल्यामुळे अशा गुंतवणूकदारांना असे काही फंड निवडणे कठीण असू शकते जे त्यांच्यासाठी योग्य असतील. 

तरीही, अनेक गुतंवणूकदार असे असतात ज्यांना मार्केटची आणि मार्केटच्या रोख्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंड सारख्या अनेक गुंतवणूक साधनांची माहिती असते. अशा गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडचा चांगला अनुभव असतो किंवा त्यांनी त्याबद्दल अभ्यास केलेला असतो. या गुंतवणूकदारांना म्युच्यु्अल फंड कसे काम करतात, त्यांचे प्रकार आणि त्यांतील उप-प्रकार काय आहेत, त्या फंडमध्ये जोखीम आणि परताव्याचा परस्पर संबंध कसा आहे आणि त्यांचे गुंतवणूक धोरण काय आहे याची बऱ्यापैकी माहिती असते. ते स्वतः अभ्यास करून काही स्कीम निवडून त्यांत गुंतवणूक करून आपल्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवू शकतात. असे गुंतवणूकदार म्युच्युअल फंडच्या डायरेक्ट प्लॅनमध्ये गुंतवणूक करतात. डायरेक्ट प्लॅनमध्ये गुंतवणूक करणे त्यांच्यासाठी योग्यच असते कारण त्यांना स्कीम निवडण्याचा योग्य आत्मविश्वास असतो आणि रेग्युलर प्लॅनच्या तुलनेत डायरेक्ट प्लॅनसाठी खर्चसुद्धा कमी बसतो.

डायरेक्ट प्लॅनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एखाद्या म्युच्यु्अल फंडच्या ऑफिसमध्ये जाऊन अर्ज दाखल करावा किंवा थेट त्यांच्या वेबसाईटवरून गुंतवणूक करावी. एखाद्या म्युच्यु्अल फंड अ‍ॅग्रीगेटर किंवा म्युच्युअल फंड रजिस्ट्रारच्या साइटवरून गुंतवणूकदार डायरेक्ट प्लॅनमध्ये गुंतवणूक करू शकतात.  रेग्युलर प्लॅन असो किंवा डायरेक्ट प्लॅन, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे फारच सोपे आहे!

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे