NAV कसा कॅलक्युलेट केला जातो?
1 मिनिट 9 सेकंद वाचण्यासाठी

नेट अॅसेट व्हॅल्यू (NAV) ही म्युचुअल फंड उद्योगातील एक महत्त्वपूर्ण संकल्पना आहे. हे म्युचुअल फंडच्या प्रति-युनिट मूल्याचे प्रतिनिधित्व करते आणि गुंतवणूकदार किती किमतीला म्युचुअल फंडमधील प्रत्येक युनिट खरेदी किंवा विक्री करतात हे दर्शवते.
NAV प्रत्येक दिवसाच्या शेवटी अपडेट केला जातो. NAV महत्त्वपूर्ण आहे कारण तो म्युचुअल फंडाची कामगिरी ट्रॅक करण्यास मदत करते. विविध कालावधीत NAV ची तुलना करून गुंतवणूकदार फंडाने कशी कामगिरी केली आहे हे जाणून घेऊ शकतात. नियमित NAV कॅलक्युलेशन आणि प्रकाशन गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीच्या मूल्याबाबत पारदर्शकता प्रदान करते.
NAV कॅलक्युलेट करण्यासाठी, तुम्हाला फंडाच्या एकूण अॅसेट व्हॅल्यू मधून त्याची देणी काढून टाकावी लागतात आणि त्याला फंडाच्या एकूण उर्वरित युनिट्सने भागावे लागते.
एखाद्या मालमत्तेची नेट व्हॅल्यू = (एकूण मालमत्ता – एकूण देणी) / फंडाच्या एकूण उर्वरित युनिट्स
चला, एक उदाहरण घेऊन समजून घेऊ की NAV कसा कॅलक्युलेट केला जातो.
समजा, एका म्युचुअल फंडाचे खालील तपशील आहेत-
> पोर्टफोलियोमधील सिक्युरिटीजची बाजारमूल्य: 50 कोटी
> रोख रक्कम: 5 कोटी
> एकूण देणी: 6 कोटी
> एकूण उर्वरित युनिट्सची संख्या: 10 लाख
आता, चला आपण खालील सूत्राचा वापर करून NAV कॅलक्युलेट करूया:
एखाद्या मालमत्तेची नेट व्हॅल्यू = (एकूण मालमत्ता* – एकूण देणी) / फंडाच्या एकूण उर्वरित युनिट्स
= (50,00,00,000+5,00,00,000−6,00,00,000)/ 10,00,000
= 490
*एकूण मालमत्ता = सिक्युरिटीजचे बाजारमूल्य + रोख रक्कम (50,00,00,000 + 5,00,00,000)
अर्थ
म्युचुअल फंडचा NAV ₹490 आहे. याचा अर्थ प्रत्येक म्युचुअल फंड युनिटची किंमत ₹490 आहे.
भारतामध्ये, NAV प्रत्येक दिवसाच्या शेवटी कॅलक्युलेट केला जातो. ही किंमत फंडाच्या पोर्टफोलियोतील सिक्युरिटीजच्या क्लोजिंग प्राइसेस दर्शवते. NAV चे कॅलक्युलेशन आणि प्रकटीकरण भारतीय सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड (SEBI) द्वारे नियमन केले जाते जेणेकरून पारदर्शकता राखली जाईल आणि गुंतवणूकदारांच्या हितांचे रक्षण केले जाईल.
अस्वीकरण
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.