तुम्हाला म्युचुअल फंड्सच्या डायरेक्ट प्लॅनमध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरेल का?

तुम्हाला म्युचुअल फंड्सच्या डायरेक्ट प्लॅनमध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरेल का?

म्युच्युअल फंड सही आहे?

बाजारात उपलब्ध असलेल्या हजारो म्युच्युअल फंड स्कीममधून एखादी व्यक्ती आपल्या / तिच्या पोर्टफोलिओसाठी 4-5 सर्वात योग्य फंडची निवड कशी करतो/करते? जर आपल्यासाठी म्युच्युअल फंड हा प्रकार नवीन असेल, तर डायरेक्ट प्लॅन पेक्षा सल्लागार / डिस्ट्रिब्यूटर यांच्या मदतीने रेग्युलर प्लॅनमध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरेल, कारण आपल्याला हे समजून घ्यायचे आहे की फंड्स कसे काम करतात, आपल्याला फंडमध्ये काय पाहावे लागते, कुठल्या प्रकारच्या फंडमध्ये गुंतवणूक करावी वगैरे.

भविष्याची उद्दिष्टे कोसळून पडतील असे चुकीचे फंड्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये घेण्यापेक्षा रेग्युलर प्लॅनमध्ये डिस्ट्रिब्यूटरचे कमीशन देणे परवडते. जर आपल्याला फंड्सचे प्रकार, गुंतवणुकीच्या उद्दिष्टाप्रमाणे फंड आपला पोर्टफोलिओ कसा तयार करतात, एखाद्या फंडमध्ये जोखमीचा स्तर, एखादा फंड शॉर्ट टर्म साठी चांगला आहे किंवा दिर्घकाला साठी, यातून नियमित मिळकत मिळेल किंवा ऐसेट निर्मिती होईल, या फंडच्या प्रदर्शनाचे संकेतक कुठले आहेत आणि शेवटी आपण कशासाठी गुंतवणूक करीत आहात हे सर्व आपल्याला कळत नसेल, तर आपल्याला आपल्या उद्दिष्टासाठी योग्य फंड निवडण्यासाठी मदतीची गरज आहे. डायरेक्ट प्लॅन त्याच गुंतवणूकदारांसाठी आहेत जे म्युच्युअल फंड्समध्ये काही काळापासून गुंतवणूक करीत आहेत आणि ज्यांना त्यांची चांगली माहिती आहे. रेग्युलर प्लॅनमध्ये गुंतवणुकीची सुरूवात करून नंतर आपल्याला आपल्या पोर्टफोलिओसोबत चांगला अनुभव झाल्यावर पुढे आपण डायरेक्ट प्लॅनमध्ये गुंतवणूक केली तर ते योग्य ठरेल.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे