डेब्ट फंडमध्ये कोणत्या जोखमींचा समावेश होतो?

डेब्ट फंडमध्ये कोणत्या जोखमींचा समावेश होतो?

म्युच्युअल फंड सही आहे?

आपण आपल्या मित्राला स्टार्ट-अप सुरू करण्यासाठी 8% दराने 5 लाख रुपये कर्ज दिले आह. (7% बँक दरापेक्षा अधिक). आपण जरी त्याला ब-याच वर्षापासून ओळखत असलात, तरीही ह्यामध्ये आपल्याला जोखीम असतेच की त्याने जर वेळेवर पैसे परत केले नाहीत, किंवा परत करूच शकला नाही. तसेच, बँक दर 8.5% पर्यंत वाढले, आणि तरीही आपली गुंतवणूक 8% वरच अडकून राहील. 

तसेच, डेब्ट फंड्स आपले पैसे बाँड आणि मनी मार्केट इंस्ट्रूमेंट यासारख्या व्याज-दरावरील सिक्युरिटीजमध्ये गुंतवतात. ह्या सिक्युरिटीज या फंड्सना नियमित व्याज देण्यासाठी वचनबद्ध असतात. म्हणूनच ज्याप्रमाणे आपण मित्रांना पैसे कर्ज म्हणून देता तेव्हा जोखीम असते, त्याप्रमाणेच डेब्ट फंड्ससाठी तीन प्रमुख जोखमी असतात. 

  • प्रथम, हे फंड्स व्याज देणाऱ्या सिक्युरीटीजमध्ये गुंतवणूक करत असल्यामुळे, त्यांच्या एनएव्ही बदलत्या व्याजदराप्रमाणे बदलत राहतात (व्याज दरातील जोखीम). व्याजाचे दर वाढल्यावर या फंड्सच्या किंमती कमी होतात, तसेच जर दर कमी झाला तर वाढतात. 
  • दुसरी म्हणजे, हे फंड्स क्रेडिट जोखीमच्या अधीन असतात, म्हणजेच फ़ंड्सनी गुंतवणूक केलेल्या मूलभूत सिक्युरिटीजवर (जसे, बाँडवर) नियमित व्याज न मिळण्याची जोखीम. 
  • अगदी वाईट परिस्थितीमध्ये असेही होऊ शकते की फंड्सना पैसे परतफेड न करता येण्याच्या जोखमीलाही तोंड द्यावे लागू शकते म्हणजे बाँड जारी करणारी संस्था वचन दिल्या प्रमाणे व्याजाची रक्कम देऊ शकणार नाही. एखाद्या डेब्ट फंडच्या मूलभूत पोर्टफोलिओ मधील एखादा बाँड पैसे परतफेड करु शकत नसेल तर, तेव्हा त्या फंडच्या व्याज उत्पन्न घटकावर परिणाम होतो आणि त्यामुळे एकूणच फंडमधून आपल्याला मिळणा-या परताव्यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो.
454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे