म्युच्युअल फंडच्या स्किम मध्ये गुंतवणूक करताना कोणते खर्च करावे लागतात?

म्युच्युअल फंडच्या स्किम मध्ये गुंतवणूक करताना कोणते खर्च करावे लागतात? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

गुंतवणूकदाराला अनेक सोयी सुविधा पुरविण्यामध्ये अनेक घटक समाविष्ट असतात, जेणेकरुन तो/ती त्यांची आर्थिक उद्दिष्टे साध्य करु शकेल.

या सर्व घटकांना त्यांचा दिलेल्या सेवांसाठी त्यांचा भत्ता द्यावा लागतो. ह्यासाठी, प्रत्येक म्युच्युअल फंड वर त्या स्किमच्या कॉर्पसची(मूळ निधीची) टक्केवारी म्हणून काही खर्च लागू केला जातो. सेबी नियमांनी यासाठी काही मर्यादा लागू केल्या आहेत, या मर्यादांच्या पलीकडे आकारण्यात आलेल्या खर्चापेक्षा खर्च अधिक असला तरी शुल्क लागू करता येत नाही. सेबी नियमावलीत नमूद केल्याप्रमाणे, जसा फंड वाढतो, तसतसा अ‍ॅसेट अंडर मॅनेजमेंट(AUM) (व्यवस्थापकीय मालमत्ता) याच्या अंतर्गत आकारलेला जास्तीत जास्त खर्च कमी होतो. 

स्किमच्या कागदपत्रांमध्ये आपण गुंतवणूक करण्याचा विचार करत असलेल्या प्रत्येक स्किमवर लागू करता येणार्‍या जास्तीत जास्त खर्चाचे गुणोत्तर दिलेले असते. मासिक फॅक्टशीट(अहवाल) आणि सहामाही अनिवार्य प्रकटीकरण आपल्याला प्रत्येक स्किमनुसार खर्च आकारला गेला आहे ते दाखवितात.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे