दीर्घकाळ गुंतवणूक करण्याचे फायदे काय आहेत?

दीर्घकाळ गुंतवणूक करण्याचे फायदे काय आहेत? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

दीर्घकाळ गुंतवणूक करा - असा सल्ला बरेच ब-याच म्युच्युअल फंड वितरक आणि गुंतवणूक सल्लागारांकडून दिला जातो. हे काही म्युच्युअल फंड्स बाबतीत खरेही आहे- जसे की इक्विटी आणि बॅलन्स्ड फंड्स.

चला आपण समजून घेऊया, की व्यावसायिक असा सल्ला का देतात. दीर्घकाळ मुदतीमध्ये नक्की काय घडते? दीर्घकाळ गुंतवणूक करण्यामध्ये खरचं फायदा होतो का?

आपल्या म्युच्युअल फंडला एक चांगल्या दर्जाचा फलंदाज समजा. प्रत्येक चांगल्या दर्जाच्या फलदांजची स्वतःची बॅटिंग करण्याची एक शैली असते. पण चांगल्या दर्जाचा फलंदाज जास्तीत जास्त धावसंख्या तेव्हाच करु शकेल जेव्हा तो जास्त वर्षासाठी खेळत राहील.

आपण “चांगल्या दर्जा” च्या फलंदाजाच्या कारकि‍र्दीबद्दल बोलत आहोत. प्रत्येक चांगला फलंदाज हा कधी ना कधी चांगली आणि वाईट कामगिरी करतच असतो. सरासरीमध्ये त्याची कारकीर्द प्रभावी असणे महत्त्वाचे असते.

तसेच, चांगल्या म्युच्युअल फंड मध्ये कधीकधी निधी व्यवस्थापकाच्या नियंत्रणात नसलेल्या घटकांमुळे चढउतार होतात. जर गुंतवणूकदाराने ह्या फंड मध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केली तर त्याला नक्कीच फायदा होईल.

त्यामुळे, जर आपल्याला शक्य असेल तर आपण विशेषतः इक्विटी आणि बॅलन्स्ड फंड्स मध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा.

452
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे