इक्विटी आणि डेब्ट फंड्स मध्ये काय फरक आहे?

इक्विटी आणि डेब्ट फंड्स मध्ये काय फरक आहे? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

“सर्व म्युच्युअल फंड्स सारखेच असतात, नाही का? शेवटी ते म्युच्युअल फंड्स आहेत, बरोबर ना?” गोकुळ ने विचारले. त्याचा म्युच्युअल फंड्स वितरक असलेला, मित्र हरीश हसला. त्याला अनेकांकडून येणार्‍या अशा शेऱ्यांची सवय होती.

अनेक लोकांचा गैरसमज असतो, की म्युच्युअल फंड्स सारखेच असतात. इथे फंड्सचे अनेक प्रकार आहेत, यामधील महत्त्वाचे आहेत, इक्विटी फंड्स आणि डेब्ट फंड्स. पैसे कुठे गुंतवले जातात यावर त्या दोन्हींमधला फरक कळतो. जिथे डेब्ट फंड्स एका फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक करतात, तिथे इक्विटी फंड्स प्रामुख्याने इक्विटी शेअर आणि त्यासंबंधित सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक करतात. दोन्ही इक्विटी आणि फिक्स्ड इन्कम फंड्स यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात जी त्या स्किम्स कशी कामगिरी करतील ते ठरवतात.

वेगवेगळ्या गुंतवणूकदारांची वैशिष्ट्ये वेगवेगळी असतात. काहींना त्यांची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जास्त परताव्यांची गरज असते, तर काहींना जास्त जोखीम स्वीकारणे परवडणारे नसते. काही गुंतवणूकदारांची उद्दिष्टे दीर्घकालीन असतात, तर काहींची मध्यम कालीन असतात. गुंतवणूकदाराने दीर्घकाळासाठी इक्विटी फंड्स निवडले पाहिजेत आणि अल्प ते मध्यम कालावधीसाठी डेब्ट फंड्स निवडले पाहिजेत; इक्विटी फंड्स मध्ये जास्त परतावा देण्याची क्षमता असते, पण त्याचबरोबर जोखीमही असते, त्याच वेळी डेब्ट फंड्स हे त्यामानाने स्थिर असतात पण मर्यादित किंवा कमी परतावे देतात.

460
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे