मी म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक केली आहे याचा पुरावा म्हणून कोणती कागदपत्रे पुरवली जातात?

मी म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक केली आहे याचा पुरावा म्हणून कोणती कागदपत्रे पुरवली जातात? zoom-icon

एकदा आपण म्युच्युअल फंड स्किम मध्ये गुंतवणूक केली की आपल्याला एक अकाऊंट स्टेटमेंट मिळते, ज्यामध्ये व्यवहाराची तारीख, गुंतवलेली रक्कम, आणि ज्या किंमतीला युनिट्स विकत घेतले ती किंमत आणि आपल्याला किती युनिट्स देण्यात आले आहेत, हे सर्व तपशील दिलेले असतात.

आपण एकाच खात्यात अनेक व्यवहार करू शकता,त्यानुसार हे स्टेटमेंट अपडेट होत राहते. एक सामान्य अकाऊंट स्टेटमेंट आपल्याला शेवटच्या काही व्यवहारांची (बरेचदा शेवटच्या 10), माहिती देते- मग ते खरेदी किंवा विक्री असेल किंवा लाभांश असतील तर त्यासंदर्भात किंवा अगदी अव्यावसायिक व्यवहारांचाही तपशील देते. अकाऊंट स्टेटमेंट मध्ये आपल्याला सध्या जमा असलेल्या युनिट्सची संख्या, अलीकडच्या तारखेची एनएव्ही आणि आपल्या गुंतवणुकीचे सध्याचे मूल्य ह्यांचे तपशील सुद्धा देते.

आपल्याकडून जर एखादे स्टेटमेंट हरवले, तर आपल्याला कधीही कोणत्याही अडथळ्यांशिवाय दुसरे मिळू शकते. जरी आपले अकाऊंट स्टेटमेंट हरवले तरी आपल्याला पुढील व्यवहारांसाठी कुठलाही प्रतिबंध केला जात नाही, अगदी खात्यातून आपले पैसे काढून घेण्यासही नाही.

454

म्युच्युअल फंड सही आहे?