म्युच्युअल फंडमधील लाभांश म्हणजे काय?

म्युच्युअल फंडमधील लाभांश म्हणजे काय?

म्युच्युअल फंड सही आहे?

म्युच्युअल फंडमधील लाभांश म्हणजे एखाद्या शेअर किंवा म्युच्युअल फंडच्या नफ्यातील एका भागाचे वितरण. म्युच्युअल फंड स्किम्समध्ये लाभांश तेव्हा वितरित केले जातात जेव्हा फंड आपल्या पोर्टफोलिओमधील सिक्युरिटीज विकून त्यांवर नफा कमावतो.

नियमांप्रमाणे, फंड फक्त त्यांच्या पोर्टफोलिओमधील त्यांने विकलेल्या सिक्युरिटीजवर होणाऱ्या नफ्यामधून किंवा व्याज आणि लाभांशच्या रूपाने मिळणाऱ्या वर्तमान उत्पन्नामधूनच लाभांश देऊ करू शकतो. असा लाभ एक डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व मध्ये स्थलांतरीत केला जातो, आणि विश्वस्तांच्या निर्णयाप्रमाणे लाभांशाची घोषणा केली जाते.

डिव्हिडंडची घोषणा स्कीमच्या फेस व्हॅल्यू (एफव्ही) प्रमाणे केली जाते, एनएव्ही प्रमाणे नाही. जर प्रत्येक युनिटची किंमत (एफव्ही) रु. 10 असेल आणि डिव्हिडंड 20% असेल, तर डिव्हिडंड पर्याय निवडणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराला दर युनिटमागे रु. 2 एवढा डिव्हिडंड मिळेल. पण, डिव्हिडंड दिल्यावर त्या स्कीमचा एनएव्ही डिव्हिडंडच्या प्रमाणत कमी होईल. 
ग्रोथ पर्याय निवडणाऱ्या गुंतवणूकदारांना डिव्हिडंड मिळत नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी स्कीमचा नफा पुन्हा स्कीममध्येच गुंतवला जातो. अशाने ग्रोथ पर्यायाचा एनएव्ही वाढतो, पण डिव्हिडंड पर्यायाचा एनएव्ही वाढत नाही.

1 एप्रिल 2020 पासून गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडमधून मिळणारा डिव्हिडंड कर-योग्य आहे. डिव्हिडंड पेआउट पर्याय निवडणाऱ्या गुंतवणूकदारांना आता आर्थिक वर्षादरम्यान त्यांना मिळालेल्या डिव्हिडंडवर त्यांना लागू असलेल्या मिळकत कराच्या सर्वात अधिक दराने कर द्यावा लागेल. डिव्हिडंड रीइन्व्हेस्ट पर्याय निवडणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी टॅक्समध्ये बदल झालेला नाही कारण त्यांना नफ्यातून त्यांच्या फोलिओमध्ये अधिक युनिट मिळतात.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे