SWP कॅल्क्युलेटर म्हणजे काय आणि त्याचा उपयोग कसा करावा?
2 मिनिट 19 सेकंद वाचण्यासाठी

वित्तीय नियोजन करताना निर्णय प्रक्रिया सुलभ असावी, आणि यासाठी काही टूल्स मदत करू शकतात. SWP कॅल्क्युलेटर हे असंच एक उपयुक्त साधन आहे, जे सिस्टेमॅटिक विथड्रॉअल प्लान (SWP) कसे कार्य करते हे समजून घेण्यास आणि इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओमधून विथड्रॉअल प्लॅन करण्यास मदत करते.
म्युच्युअल फंड सुविधांमध्ये सिस्टेमॅटिक विथड्रॉअल प्लान (SWP) अंतर्भूत असतो, जो इन्व्हेस्टर्सना निश्चित कालावधीत ठराविक रक्कम काढण्यास मदत करतो. संपूर्ण इन्व्हेस्टमेंट रिडीम करण्याच्या ऐवजी, SWP इन्व्हेस्टर्सना काही भागच काढण्याची सुविधा देते, ज्यामुळे नियमित उत्पन्नाचा प्रवाह सुरू राहतो, तर उर्वरित रक्कम वाढत राहते किंवा परतावा निर्माण करत राहते.
SWP म्युच्युअल फंड कॅल्क्युलेटर हे एक ऑनलाइन साधन आहे, जे इन्व्हेस्टमेंट कॉर्पस, अपेक्षित परतावा आणि विथड्रॉअल कालावधी यांच्या आधारे, तुम्ही किती रक्कम नियमितपणे काढू शकता याचा अंदाज देण्यास मदत करते. हे तुम्हाला प्रत्येक विथड्रॉअलनंतर तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये किती रक्कम शिल्लक राहील याचे स्पष्ट चित्र प्रदान करते.
या कॅल्क्युलेटरची मुख्य वैशिष्ट्ये:
सोपी इनपुट फील्ड्स: यात गुंतवणूक रक्कम, विथड्रॉअल रक्कम, वारंवारता, अपेक्षित परतावा दर, आणि कालावधी यासारख्या सोप्या माहितीची गरज असते.
अचूक अंदाज: तुम्ही ठरवलेल्या विथड्रॉअल रेटच्या आधारे हा कॅल्क्युलेटर दाखवतो की तुमची गुंतवणूक किती काळ टिकेल. मात्र, मार्केटमधील चढ-उतार आणि म्युच्युअल फंड परतावा बाजाराच्या जोखमीच्या अधीन असल्याचे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
वैयक्तिक गरजेनुसार समायोजन: तुम्ही विथड्रॉअल रक्कम किंवा अपेक्षित परतावा ॲडजस्ट करून त्याचा तुमच्या गुंतवणुकीवर होणारा परिणाम पाहू शकता.
आर्थिक नियोजन: शाश्वत आणि संतुलित विथड्रॉअल प्लॅन तयार करण्यात मदत करते, जेणेकरून गुंतवणूक पटकन संपणार नाही आणि दीर्घकाळ टिकेल.
SWP कॅल्क्युलेटर वापरण्याचे मुख्य टप्पे:
- गुंतवणूक रक्कम प्रविष्ट करा: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवलेली एकूण रक्कम इनपुट करा.
- विथड्रॉअल रक्कम निवडा: तुम्हाला नियमित अंतराने (मासिक, तिमाही इ.) किती रक्कम काढायची आहे ते निर्दिष्ट करा.
- विथड्रॉअलची वारंवारता ठरवा: पैसे काढण्याचे अंतर (मासिक, तिमाही, वार्षिक) निवडा.
- अपेक्षित परतावा प्रविष्ट करा: अंदाजे परतावा दर प्रविष्ट करा, हे लक्षात ठेवून की म्युच्युअल फंड परतावा हा बाजाराच्या स्थितीनुसार बदलू शकतो.
- विथड्रॉअल कालावधी निवडा: तुम्ही किती कालावधीसाठी पैसा काढण्याची योजना आखली आहे ते ठरवा.
- निकाल पहा: कॅल्क्युलेटर तुम्हाला पुढील माहिती प्रदान करेल:
प्रत्येक विथड्रॉअलनंतर उरलेली रक्कम.
तुमचा कॉर्पस निधी किती काळ टिकेल.
कालांतराने काढलेली एकूण रक्कम.
SWP कॅल्क्युलेटर हे अशा गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त साधन आहे, जे दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांवर परिणाम न होऊ देता नियोजनबद्ध पद्धतीने निधी काढू इच्छितात. हे साधन प्रभावी नियोजन, मानसिक शांती आणि आर्थिक सुरक्षितता प्रदान करते. योग्य निर्णय घेण्यासाठी हे साधन तुमच्या एकूण गुंतवणूक धोरणाचा भाग बनवा. तथापि, हे लक्षात ठेवा की हा कॅल्क्युलेटर अंतिम निर्णय घेण्याचे एकमेव साधन नसावे. गुंतवणूक करण्यापूर्वी अनेक इतर घटकांचेही मूल्यांकन करणे आवश्यक आहे.
अस्वीकरण: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.