गुंतवणूक करण्यासाठी अधिक योग्य पर्याय कुठला: ईटीएफ किंवा इंडेक्स फंड?

Video
म्युच्युअल फंड कैलकुलेटर

म्युच्युअल फंड सही आहे?

इंडेक्स म्युच्युअल फंड आणि ईटीएफ दोन्हीही अक्रिय गुंतवणुकीची साधने आहेत जी एखाद्या मुलभूत मापदंडाच्या इंडेक्समध्ये गुंतवणूक करतात. इंडेक्स फंड्स म्युच्युअल फंडसारखे काम करतात, तर ईटीएफ शेअर्स सारखे ट्रेड केले जातात. त्यामुळे एका ऐवजी दुसऱ्याला निवडणे आपल्या गुंतवणुकीच्या प्राधान्यावर अवलंबून असते कारण दोन्हीमध्ये अक्रिय गुंतवणुकीच्या नीतिचा अवलंब केला जातो.

ईटीएफ दिवसभर ट्रेडिंग करण्यासाठी, लिमिट किंवा स्टॉप ऑर्डर आणि शॉर्ट-सेलिंगसाठी उपयोगी आहेत, पण जर आपल्याला बाजाराची वेळ साधणे आवडत नसेल तर आपल्यासाठी इंडेक्स फंड अधिक चांगले आहेत. ईटीएफ मधील अधिक व्यवहारांमुळे आपला कामिशनचा खर्च वाढून परतावा कमी होण्याची शक्यता असते, तसेच इंडेक्स फंडच्या तुलनेत त्यांची खर्चाची टक्केवारी कमी असते. तर इंडेक्स फंड आपल्याला आपल्या वित्तीय गरजांप्रमाणे अनेक पर्याय देतात, जसे दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी ग्रोथ पर्याय किंवा नियमित उत्पन्नासाठी लाभांशाचा(डिव्हिडंड) पर्याय. इंडेक्स फंड मध्ये आपण एसआयपी द्वारे कमी रकमेची नियमित गुंतवणूक करू शकता. आपल्याला ईटीएफ साठी डीमॅट खात्याची गरज असते, तर इंडेक्स फंडचे तसे नाही.

दोन्ही पर्यायांमध्ये अक्रिय गुंतवणुकीद्वारे बाजाराच्या मोठ्या भागामध्ये गुंतवणूक केली जाते, तर सोयीच्या दृष्टीने त्यांच्या कार्यात्मक फरकांमुळे आपला निर्णय बदलू शकतो. ज्याप्रमाणे आपल्याला मुंबईहून गोव्याला जायचे असेल तर आपण ट्रेन किंवा रात्रभर धावणाऱ्या बसचा पर्याय निवडू शकता. दोन्ही मार्ग आपल्या उद्दिष्टासाठी योग्य आहेत, पण एका ऐवजी दुसऱ्याची निवड करणे आपल्या सोयीवर अवलंबून असून ती निव्वळ एक वैयक्तिक निवड आहे.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे