माझी आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी डेब्ट फंड्स योग्य आहेत का?

माझी आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी डेब्ट फंड्स योग्य आहेत का?

म्युच्युअल फंड सही आहे?

इक्विटी फंड्सच्या तुलनेत डेब्ट फंड्स कमी पण स्थिर परतावे देतात. ते पोर्टफोलिओला स्थिरता देतात कारण ते फिक्स्ड इनकम मार्केटमध्ये व्यवहार करतात जे इक्विटी फंड्स वर प्रभाव टाकणाऱ्या स्टॉक मार्केट पेक्षा अधिक स्थिर असतात. प्रत्येकाला भविष्यातील अनेक आर्थिक उद्दिष्टे जसे की, मुलाचे महाविद्यालयीन शिक्षण, वैद्यकीय खर्च, घर, निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे नियोजन इ. साध्य करण्यासाठी तयार केलेले आर्थिक नियोजन आवश्यक असते. आपण आपले पैसे आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर निर्माण होणारी आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या असेट्समध्ये गुंतवतो, जसे की प्रॉपर्टी, सोने, स्टॉक्स, म्युच्युअल फंड्स.

डेब्ट फंड्स अल्पकालीन स्वरूपाच्या उद्दिष्टांसाठी सगळ्यात योग्य आहेत. या विरुद्ध इक्विटी फंड्स त्यांच्या अल्पकाळातील त्यांच्या अस्थिर स्वरूपामुळे दीर्घकालीन उद्दिष्टे जसे की निवृत्ति योजना यासाठी अधिक योग्य आहेत. काही डेब्ट फंड्स जसे की लिक्विड म्युच्युअल फंड्स, जर आपल्याला बोनस मिळाला किंवा इतर काही गुंतवणूक विकली आणि आपण ह्या पैशांचे काय करायचे हे ठरवत असाल, तेव्हा आपले पैसे काही काळ त्यामध्ये ठेवण्यासाठी योग्य आहेत. डेब्ट फंड्स अशा उद्दिष्टांसाठी योग्य आहेत जिथे आपल्याला उद्दिष्टे साध्य करण्यामध्ये अयशस्वी होण्याचा धोका पत्करायचा नसेल, जसे की आपल्याला 2 वर्षांमध्ये महाविद्यालयीन शिक्षणासाठी पैसे काढून घ्यायचे आहेत. अशा उद्दिष्टांसाठी आपण आपले पैसे फिक्स्ड इन्कम फंड मध्ये गुंतवू शकता. म्हणूनच डेब्ट फंड्स प्रत्येक आर्थिक योजनेचा भाग असायला हवेत.

459
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे